कामगार, कष्टकरी वर्गाला  न्याय देणारा अर्थसंकल्प – मंत्री ॲड.आकाश फुंडकर – महासंवाद

कामगार, कष्टकरी वर्गाला  न्याय देणारा अर्थसंकल्प – मंत्री ॲड.आकाश फुंडकर – महासंवाद
- Advertisement -




मुंबई, दि. १० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेला हा अर्थसंकल्प शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करणारा आहे. त्यामुळे रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील. विशेषतः कामगार आणि कष्टकरी वर्गासाठी हा अर्थसंकल्प न्याय देणारा असून, त्यांना सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देणारा ठरेल, असे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी अर्थसंकल्पावर भाष्य केले आहे.

महाराष्ट्र आता एका नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे आणि हा अर्थसंकल्प त्या दिशेने बळकट पाऊल असल्याचेही मंत्री ॲड.फुंडकर यांनी म्हटले आहे.

०००







- Advertisement -