Home ताज्या बातम्या खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेच्या रक्षकांचे पोलीस आयुक्तांकडून कौतुक

खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेच्या रक्षकांचे पोलीस आयुक्तांकडून कौतुक

0

पुणे : परवेज शेख

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी, गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी गुरुवार सकाळ पासून पुणे शहरामध्ये लाखो भाविक गर्दी केली होती.

या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास आणि घातपाती कृत्य करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यास पोलीस दल सज्ज होते त्याच बरोबर सर्व परवानाधारक खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेच्या मालकांनी आपले एकूण दोनशेहून अधिक स्वयंसेवक आणि प्रशिक्षित सरक्षा कर्मचारी पोलीस दलाच्या ताफ्यात बंदोबस्त करतांना दिसले.

बंदोबस्तातील नियमनासाठी दहशतवादाचा धोका, पाकीटमार, मोबाईल चोर, शांततेचा भंग करणारे टोळके, सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट व भुरट्या चोरांचा उच्छाद या सा-या गर्तेत सुरक्षा यंत्रणेला हे मोठे आव्हान होते त्यात रोड रोमिओंवर आळा घालण्यासाठी रक्षकांच्या माध्यमातून स्वयंसेवकांची फळी सज्ज केली .

आणि ट्रॅफिक वॉर्डन, फायर वॉर्डन, खासदूत व विशेष पोलीस दूत म्हणून २४ तास पोलिसांच्या मदतीला उभे राहिले. गणेशोत्सवात शहरात येणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी भारत शिल्ड फोर्स,स्टार सेक्युरिटी, ब्लॅक कॅट सिक्युरिटी,प्रसन्ना असोसिएट, डी. के ग्रुप, पी&पी एन्टरप्रायझेस, सिध्दीविनायक फॅसिलिटेज तसेच द रॉयल अकॅडेमी, ए. एम कॉलेजचे छात्रसेना …. आपले कर्तव्य पार पाडले.

या वेळी पुणे मा. पोलीस आयुक्त, डॉ. के. वेंकटेशम (भापोसे),मा. पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे (भापोसे) ,मा. अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) अशोक मोराळे (भापोसे), पोलीस उपायुक्त ( गुन्हे )बच्चन सिंग, मा.पोलीस उप-आयुक्त स्वपना गोरे यांनी सर्वांचे कौतूक केले.