Home ताज्या बातम्या रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; रिक्षात विसरलेली बॅग केली परत

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; रिक्षात विसरलेली बॅग केली परत

0

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; रिक्षात विसरलेली बॅग केली परत
बॅग परत केल्यानंतर प्रवाशाने दिलेले बक्षीस रिक्षाचालकाने नाकारले

भूषण गरुड :एका रिक्षाचालकाने रिक्षात विसरलेली प्रवाश्याची बॅग बिबवेवाडी पोलीस स्टेशन मध्ये आणून पोलिसांन मार्फत बॅग मूळ मालकाला परत केल्याचा प्रकार पुण्यात घडला. बिबवेवाडी पोलिसांनी रिक्षाचालक वाहिद सुतार यांच्या प्रामाणिकपणाचा सत्कार केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 
सोमवार दिनांक दि.१६ सप्टेंबर २०१९ रोजी डॉ.अमित कांबळे (रा.तोडकर रेसिडंसी,बिबवेवाडी,पुणे) हे बिबवेवाडी ते शिवाजीनगर असा रिक्षाने प्रवास करीत असताना. त्यांचा पासपोर्ट व इतर महत्वाचे कागदपत्रे असलेली बॅग प्रवासा दरम्यान रिक्षात विसरल्याने त्यांनी त्यांची पत्नी धनश्री कांबळे यांना सदर घडलेल्या घटनेची माहिती दिली धनश्री कांबळे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात येवुन पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती देत असताना त्यावेळेस रिक्षाचालक वाहिद अनिस सुतार (रा.सिध्दी विनायककॉलनी,शास्त्रीनगर,कोथरुड, पुणे) यांनी रिक्षात विसरलेली बॅग बिबवेवाडी पोलिसांना आणून दिली. बिबवेवाडी पोलिसांनी डॉ.अमित कांबळे व धनश्री कांबळे यांची रिक्षात विसरलेली बॅगेची ओळख पटवून रिक्षाचालकाच्या समक्ष परत केली.
बॅग सुरक्षितपणे मिळाल्याबाबत डॉ.अमित कांबळे व त्यांची पत्नी धनश्री कांबळे यांनी रिक्षाचालकाचे व पोलीसांचे कौतुक करत आभार मानले.

सदर घटनेप्रकरणी,
बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी पोलीस उपनिरीक्षक काळे,थोरात,लिटे, सहाय्यक पोलीस फौजदार जगताप, पोलीस हवालदार तणपुरे, महिला पोलीस नाईक मोटे व डॉक्टर अमित कांबळे व त्यांची पत्नी धनश्री कांबळे यांच्या उपस्थितीत रिक्षाचालक वाहिद सुतार यांच्या प्रामाणिकपणाचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.