Home गुन्हा आयफोन मोबाईलची चोरी करणाऱ्या सराईत दोन गुन्हेगारांना कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद

आयफोन मोबाईलची चोरी करणाऱ्या सराईत दोन गुन्हेगारांना कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद

0

आयफोन मोबाईलची चोरी करणाऱ्या सराईत दोन गुन्हेगारांना कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद

भूषण गरुड :कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या आदेशानुसार पोलिस स्टेशन मधील दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना. तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन सराईत गुन्हेगारांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यांची सखोल चौकशी केली असता. त्यांनी कोंढवा पोलीस स्टेशनच्या  अभिलेखा वरील चोरीचा दाखल गुन्ह्या केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी अटक केलेले सराईत गुन्हेगार खालीद जावेद शेख (वय 21), योगेश प्रकाश मुस्तारी (वय 20) हे दोघे (राहणार.टिळेकर नगर,कोंढवा बुद्रुक,पुणे) यांच्याकडून चोरीच्या सदर गुन्ह्यात 10 हजार रुपयेचा आयफोन मोबाईल व 1 हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या आदेशानुसार अभिलेखा वरील गुन्ह्यांचा तपास करत असताना तपास पथकातील पोलिस शिपाई वळे, पोलीस नाईक वनवे, कुंभार यांना त्यांच्या बातमीदाराकडून  मिळालेल्या माहितीच्या आधारे व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेप्रमाणे सराईत गुन्हेगार खालीद जावेद शेख (वय  21), योगेश प्रकाश मुस्तारी (वय 20) हे दोघेही (राहणार.टिळेकर नगर,कोंढवा बुद्रुक,पुणे) यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यांची सखोल चौकशी केली असता. कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 763 /19 भा.द.वि. कलम 379,34 प्रमाणे दाखल गुन्ह्या केल्याचे कबूली दिली. आरोपींना सदर गुन्हयात अटक करत चोरी केलेला 10 हजार रूपये किंमतीचा आयफोन मोबाईल व 1 हजार रुपये रोख रक्कम, असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदरची कामगिरी,
मा.श्री सुहास बावचे सो. पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5, मा.श्री.सुनील कलगुटकर सो.सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे, मा.श्री. मुरलीधर करपे सो.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो.कोंढवा पोलीस ठाणे, श्री. महादेव कुंभार सो.पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे स.पो.नि.चेतन मोरे, पोउपनि संतोष शिंदे व तपास पथकातील पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.