Home गुन्हा सोनसाखळी चोराला एक वर्ष साधा कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली

सोनसाखळी चोराला एक वर्ष साधा कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली

0

सोनसाखळी चोराला एक वर्ष साधा कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली

भूषण गरुड : पुणे शहर कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेणाऱ्या चोरट्याला एक वर्षाचा साधा कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2019 रोजी न्यायालयाने सुनावली. लष्कर कोर्ट पुणे सत्र न्यायाधीश मा.श्रीमती आर.एस.पाटील यांनी हा आदेश दिला आहे.

राजू खेमु राठोड (वय 35, रा.रघुनाथ नगर,वडगाव शेरी,पुणे) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोमल खरात (वय 22, रा.साईनगर,कोंढवा बुद्रुक,पुणे) या तरुणीने फिर्याद दिली आहे.

साईनगर, कोंढवा बुद्रुक या ठिकाणी शुक्रवार दिनांक 14 जून 2018 रोजी दुपारी 03:40 वा. सुमारास सोनसाखळी चोरीची घटना घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील श्रीमती ए.के.नवगिरे, पैरवी अधिकारी एस.ए.पाटील यांनी काम पाहिले.

सदर घटने प्रकरणात,
पुणे शहर कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शना खाली व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांनी गुन्ह्याचा तपास केला व कोर्टाच्या कामकाजात पोलीस नाईक निलेश वनवे, विनोद धामणगावकर, पोलीस शिपाई संदीप नेवरे यांनी मदत केली.