Home ताज्या बातम्या कांद्याला चांगला भाव मिळत असला तरी आज बोटावर मोजता येण्याइतक्याच शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक

कांद्याला चांगला भाव मिळत असला तरी आज बोटावर मोजता येण्याइतक्याच शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक

0

कांद्याला चांगला भाव मिळत असला तरी आज बोटावर मोजता येण्याइतक्याच शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक

भूषण गरुड : विषम हवामानामुळे बाजारात कांद्याची आवक घटून कांद्याचे दर चांगलेच वाढलेले आहेत. बाजार समितीत चांगल्या प्रतिच्या कांद्याला ५० रूपये प्रतिकिलो असा विक्रमी दर मिळाला, मात्र जरी कांद्याला चांगला भाव मिळत असला तरी आज बोटावर मोजता येण्याइतक्याच शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे.
त्यामुळे या भाववाढीचा शेतकऱ्यांचा किती फायदा होईल हे येणारा काळच ठरवेल. राज्यातील काही भागात अविृष्टी तर काही भागात भीषण दुष्काळ अशा विषम परिस्थितीमुळे शेतमालाच्या उत्पादनावर कमालीचा दुष्परिणाम झाला आहे.त्यामुळे आजही अनेक भागात पेरण्याच झाल्या नाहीत तर अनेक भागात अतिवृष्टीने सर्वकाही उद्ध्वस्त झाले आहे.त्यामुळे मार्केटमध्ये येणाऱ्या कांद्याच्या आवकेवर यांचे गंभीर परिणाम झाले आहेत. याची परिणीती राज्यात सध्या कांद्याचे दर कमालीचे कडाडले आहेत. 
कांद्यासोबतच इतर शेतमालाचे देखील उत्पादनात घट झाल्याने बाजारात आवक कमी होत असल्याने अनेक भाज्यांचे देखील दर वधारले आहेत.. सध्या ज्याभागातून राज्यभारात कांदा विक्रीसाठी येत असतो नेमका त्याचा भागात अतिवृष्टी पुराचा फटका बसला आहे.त्यामुळे सध्या बाजारात मागणी असलेल्या तूलनेत आवक अत्यंत कमी होत आहे.पावसाने आवक झालेला व येणारा माल देखील अनेक वेळा भिजल्याने खराब होत आहे.
त्यातच मागील वर्षी कांद्याला अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे खर्च झालेला खर्च देखील वसूल झाला नव्हता. त्यामळे यावेळी नफा नाही मिळाला तरी चालेल परंतु तोटा नको या भितीपोटी अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड करणे टाळले होते. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत कांदा उत्पादनच ५० टक्यांवर आले आहे. आणि त्यातही परत पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसल्याने परत त्यात आनखी नुकसान झाले.