Home ताज्या बातम्या दोन लोणी काळभोर पोलीस वार्डने सहकाऱ्यांच्या मदतीने चार किलोमिटरचा पाठलाग करुन तीन तरणांना मृतदेहासह घेतले ताब्यात

दोन लोणी काळभोर पोलीस वार्डने सहकाऱ्यांच्या मदतीने चार किलोमिटरचा पाठलाग करुन तीन तरणांना मृतदेहासह घेतले ताब्यात

0

दोन लोणी काळभोर पोलीस वार्डने सहकाऱ्यांच्या मदतीने चार किलोमिटरचा पाठलाग करुन तीन तरणांना मृतदेहासह घेतले ताब्यात

भुरट्या चोऱ्या करत असताना आपलाच सहकारी शिवीगाळ व दमदाटी करतोय या रागापोटी, तीन तरुणांनी चोविस वर्षीय सहकाऱ्याचा येरवडा परीसरातील सादलबाबा दर्ग्याजवळ गुरुवारी (ता. 19) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तिष्ण हत्याऱ्याने व दगडाने ठेचून खून केला. खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी येरवडा येथुन वाघोली ते केसनंद-कोलवडी मार्गे थेऊरहून पुणे-सोलापूर महामार्गाकडे जात असताना, लोणी काळभोर पोलिसांच्या वहातूक शाखेतील एका पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे खून करणारे तीनही तरुण चार किलोमिटर अंतराच्याच्या पाठलागानंतर मृतदेहासह लोणी काळभोर पोलिसांच्या हाती लागले.

संदीप देवकर (बक्कल नंबर 166) हे सतर्कता दाखवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव असुन, देवकर यांनी दत्ता महादेव वीर व विजय विक्रम शिंदे या दोन वार्डन सहकाऱ्यांच्या मदतीने थेऊरगाव ते थेऊरफाटा या दरम्यान चार किलोमिटरचा पाठलाग करुन तीन तरणांना मृतदेहासह ताब्यात घेतले आहे. भारत राजू बढे (वय 24, रा. कासारवाडी पुणे) या तरुणाचा खुन झाल्याचे निस्पन्न झाले असुन, बढे याचा खुन करुन, त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत असतांना पोलिसांनी अशोक संतोष आडवाणी (वय 22 रा. पिंपरी), अक्षय दिलीप पवार (वय 19) व विजय संतोष पवार (वय-19,  रा. वरवंड ता. दौंड) या तिघांना कुंजीरवाडी हद्दीतील लक्ष्मी मंगल कार्यालयातुन ताब्यात घेतले आहे. दरम्यान ताब्यात घेतलेल्या तीनही तरुनांनी भारत बढे याचा खुन केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत भारत बढे याच्यासह अशोक आडवाणी, अक्षय पवार व विजय पवार हे चौघेजण एकमेकांचे मित्र असून, चाैघेही भुरटे चोर आहे. मागिल कांही दिवसापासून भारत बढे हा दारु पिल्यानंतर इतर तिघांना शिवीगाळ व दमदाटी करत होता. यातुन चौघांत वाद सुरु झाला होता. गुरवारी रात्री अकरा वाजनेच्या सुमारास सादल बाबा दर्गाजवळ चौघेही दारु पित असताना, बढे याने दारुच्या नशेत दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. यातून किरकोळ वादावादीला सुरुवात झाली. त्यातूनच अशोक आडवाणी, अक्षय पवार व विजय पवार या तिघांनी तिष्ण हत्याऱ्याने व दगडाने ठेचून खून केला. खुन केल्यानंतर भेदरलेल्या तिघांनीही भारतच्या मृतदेहाला प्लास्टिक गोणीने झाकण्याचा प्रयत्न केला. व मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने, मृतदेहाला दुचाकीवर बसवले. मृतदेह व वरील तिघेजण एकाच दुचाकीवरुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जागा शोधू लागले. मात्र रस्त्यावर वहातूक चालू असल्याने, मृतदेह घेऊन तिघेही येरवड्याहून वाघोली ते केसनंद-कोलवडी मार्गे थेऊरहुन पुणे-सोलापुर महामार्गाकडे निघाले होते. 

अशोक आडवाणी, अक्षय पवार व विजय पवार हे तीघेजण मृतदेहासह पहाटे साडेतीन वाजनेच्या सुमारास थेऊरगावातुन थेऊरफाट्याकडे जात असताना, रात्रीच्या गस्तीसाठी गावात थांबलेल्या संगृदीप देवकर यांनी वरील मोटारसायकलवरुन जाणाऱ्या चौघांना पाहिले. मोटारसायलवरील तीघांच्या कपड्यावर रक्त सांडलेले तर एकाच मोटारसायलवर चौघे यात काही तरी गोची असल्याचे लक्षात येताच, संदीप देवकर व त्यांच्या सोबत असणआऱ्या होमगार्ड दत्ता वीर व विजय शिंदे या दोन सहकाऱ्यांनी मोटारसायकलचा पाठलाग सुरु केला. पोलिस पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच, वरील तीघांनी मोटारसायल थेऊरफाट्यावरीव लक्ष्मी मंगल कार्यालयात घुसवली. व तिघेही अंधारात लपले. मात्र संदीप देवकर यांनी जीवाची पर्वा न करता मंगल कार्यालयात घुसून तिघांना ताब्यात घेतले, व याबाबतची माहिती पोलि्स अधिकाऱ्यांना कळवली. त्यानंतर पाच मिनीटात पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वरील तिघांना ताब्यात घेतले. व अंधारात फेकलेला भारत बढे याचा मृतदेहही ताब्यात घेतला. लोणी काळभोर पोलिस पुढील तपास करत आहेत.