Home ताज्या बातम्या गॅस सिलेंडरचा वाहतूक करणारा टेम्पो पलटी

गॅस सिलेंडरचा वाहतूक करणारा टेम्पो पलटी

0

गॅस सिलेंडरचा वाहतूक करणारा टेम्पो पलटी

भूषण गरुड :पुणे शहर बिबेवाडीत गंगाधाम चौक,आई मातामंदिर रोडच्या उतारावरती भारत गॅसचा १५० सिलेंडरने भरलेला टेम्पो पलटी झाल्याची घटना शनिवार दिनांक २१ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ०९:४० वाजता घडली. यात टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल.

प्राप्त माहितीनुसार,
बिबवेवाडीत गंगाधाम येथील भारत गॅस गोडाऊन मधून १५० सिलेंडर भरलेला टाटा कंपनीचा ४०७ Ex टेम्पो क्रमांक.MH-१२-KP-७१५० मार्केटयार्ड याठिकाणी जात असताना. गंगाधाम चौक,आई मातामंदिर रोडच्या उतारावर वाहन चालकाचे टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्याकडेला पलटी झाला. यात टेम्पो चालक – महादेव कांबळे वय( ३५ ) हा किरकोळ जखमी झाला.

गॅस सिलेंडरचा टेम्पो अचानक पलटी झालेल्या अपघातात शेकडो सिलेंडर गंगाधाम चौक,आई माता मंदिराच्या रोडच्या रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले असताना परिसरात भितीचे वातावरण झाले होते.

घटनास्थळी कोंढवा खुर्द अग्निशमन दल व पोलिस दाखल झाले होते. अस्ताव्यस्त पडलेले सिलेंडरचा पेट होऊन कुठलीही अनुचित घटना घडू नये याकरिता अग्निशमन दलाच्या जवानांनी खबरदारी घेत एक एक सिलेंडरची तपासणी करत रस्त्याच्या कडेला जमा केले व पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेल्या टेम्पो सरळ केला. कोंढवा खुर्द  अग्निशमन दल सदर वर्दि वरील फायर स्टेशनचे जवान तांडेल – बिबवे, ड्रायव्हर – चव्हाण, फायरमन – दळवी,वानखडे,टिळेकर,गायकवाड,किवळे उपस्थित होते