Home गुन्हा अमली पदार्थाची तस्करी करणारा नायजेरियन नागरिक गजाआड आपर पोलीस आयुक्त आशोक मोराळे यांची धडाके बाज कारवाई

अमली पदार्थाची तस्करी करणारा नायजेरियन नागरिक गजाआड आपर पोलीस आयुक्त आशोक मोराळे यांची धडाके बाज कारवाई

0

पुणे : परवेज शेख

अंमली पदार्थ विरोधी पथक (पश्चिम) नेमणुकीतील psi महाडिक व स्टॉफ यांना गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाली होती की कोंढवा येथील ब्रह्मा अवेन्यू सोसायटी समोर एक नायजेरियन इसम कोकेन विक्रीसाठी घेऊन येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती.नायजेरियन युवकाला 12 लाखाच्या कोकणसह अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते व पोलीस उपनिरीक्षक निलेश महाडिक यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की कोकेन तस्करी करणारा नायजेरीन युवक कोंढव्यातील ब्रम्हा अवेन्यू सोसायटीसमोर येणार आहे.

सदर ठिकाणी सापळा रचून संबंधित नायजेरियन युवकास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे कोकेन हे अमली पदार्थ आढळून आले. उबा सेवियर गुडविन (रा. समर्थ अपार्टमेंट, पिसोळी. मूळ रहिवासी नायजेरिया ) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या पाठीवरील बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये पासपोर्ट, भारतीय चलनातील नोटा व कोकेन आढळून आले. एकूण बारा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास काेंढवा पाेलिस स्टेशनचे वरिष्ठ पाेलिस निरिक्षक विजय टिकाेळे हे करित आहेत.

सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्री बच्चनसिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक निलेश महाडिक, किशोर तनपुरे, पोलीस कर्मचारी अविनाश मराठे, भाऊसो कोंढरे, प्रसाद मोकाशी, रमेश गरुड, उदय काळभोर, पांडुरंग वांजळे, धीरज भोर, महेश कदम, मनोज शिंदे, विजय गुरव, सचिन कोकरे, संदीप साबळे, प्रवीण पडवळ, अमोल पिलाने, नारायण बनकर यांनी केली