Home गुन्हा सोशल नेटवर्कच्या माध्यमातून माणगांव मधील अल्पवयीन मुलीला प्रेमात पाडून लाॅज वर केला संभोग

सोशल नेटवर्कच्या माध्यमातून माणगांव मधील अल्पवयीन मुलीला प्रेमात पाडून लाॅज वर केला संभोग

0

पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

बोरघर / माणगांव: ( विश्वास गायकवाड ) माणगांव तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या एका मागासवर्गीय अल्पवयीन मुलीशी सोशल नेटवर्कच्या माध्यमातून जवळीक साधून आरोपी दिपक उर्फ राज राजेश शर्मा वय 25 मूळ रा. शिकारपुरा, मध्यप्रदेश सध्या रा. नटराज हॉटेल स्वारगेट पुणे यांनी सदर अल्पवयीन मुलीला लाॅज वर नेवून तिच्याशी अनैतिक शरीर संबंध प्रस्थापित केले.
सदर घटनेची बाबत माणगांव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी दिलेल्या पुराव्यातील जबाबानुसार सदरची मुलगी ही 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कपडे अल्टर करण्याकरिता माणगांव येथे गेली असता आरोपी दिपक शर्मा याने तिला लग्नाचे आमिष दाखवून माणगांव येथील निजामपूर रोड येथे असलेल्या गौरी लॉज मध्ये घेऊन जाऊन रात्रीच्या वेळेस तिच्या अंगाशी लगट करून कपडे काडून जबरदस्तीने दोन वेळा अनैतिक शरीर संबंध प्रस्थापित करून संभोग केला असे सांगितले. फिर्यादी यांच्या नमूद पुरवणी जबाबावरून माणगांव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजि नं. 149/2019 भा. द. वि. क. 363 यामध्ये भा. द. वि. क. 376(1), 366(अ) सह लैगिंक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 कलम 3(अ), 4,5(एल), 6 अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंध अधिनियम 1989 व सुधारित 2015 कलम 3(1)(W)(i)(ii), 3(2)(v) प्रमाणे कलम वाढ करण्यात आली असून सदर गुन्ह्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना माहिती देण्यात आलेली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी काशीद करीत आहेत.