Home गुन्हा बेकायदेशीर लाॅज चालकांवर होणार कारवाई : उप विभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशिद

बेकायदेशीर लाॅज चालकांवर होणार कारवाई : उप विभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशिद

0

मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असताना सदर अल्पवयीन मुलीला बेकायदेशीर रित्या गैर पुरुषा सोबत रात्रभर लाॅजवर ठेवून घेणाऱ्या गौरी लाॅजवर कायदेशीर कारवाई करणार : उप विभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशिद

बोरघर / माणगांव : ( विश्वास गायकवाड ) आरोपी दिपक उर्फ राज राजेश शर्मा हा मुळचा राहणार शिकारपुरा मध्यप्रदेश व सद्या पुण्यातील नटराज हाॅटेल मध्ये वेटरचे काम करणाऱ्या या तरुणाने सोशल नेटवर्कच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्याच्या एका ग्रामीण भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिला आपल्या फसव्या प्रेमाच्या मोहजालात अडकवून तिला माणगांव शहरातील बस स्थानकात भेटायला बोलवून तिच्याशी गोड गोड बोलून तिच्याशीच लग्न करण्याचे खोटे आमिष दाखवून तिला त्याने आधीच बुकिंग करुन ठेवलेल्या माणगांव शहरातील निजामपूर रोड लगत असलेल्या गौरी लाॅजवर नेवून तिच्याशी यथेच्छ शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कपडे अल्टर करण्यासाठी माणगांवला जाते असे घरी आईला सांगून गेलेली आपली मुलगी सायंकाळी उशिरा पर्यंत घरी परत न आल्याने घरातील सर्व मंडळींनी तिची शोधाशोध सुरू केली. तो पर्यंत काळोख झाला होता. त्यामुळे तिच्या आईने माणगांव पोलीस ठाण्यात तिच्या मिसिंग ची तक्रार केली. माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी आपल्या सहकारी पोलीसांना सोबत घेऊन पोलीस तपासाची चक्रे गतीमान केली. मोबाइल फोन ट्रॅप लोकेशनच्या आधारे संबंधित प्रकरणाचा पर्दाफाश केला. सदर घटनेत संबंधित तरुणाने या अल्पवयीन मुलीच्या अज्ञान पणाचा पुरेपूर फायदा घेऊन लाॅजवर संपूर्ण रात्रभर तिच्या अल्पवयीन वयाचा अथवा तिच्या

अपरिपक्व कोवळ्या शरिराचा विचार न करता यथेच्छ शारीरिक संबंध प्रस्थापित करुन उपभोग घेतला. त्यामुळे या अल्पवयीन मुलीचे भावी आयुष्य उध्वस्त झाले आहे. त्यामुळे एक निष्पाप अबोल कळी फुलण्या आधीच कुस्करली गेली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. परंतु या अल्पवयीन मुलीला एका गैर तरुण पुरुषा सोबत रात्रभर बेकायदेशीर रीत्या केवळ पैशाच्या मोहापायी लाॅजींग कायद्याच्या निर्देशांचा भंग करुन सदर अल्पवयीन मुलीचे भावी आयुष्य उध्वस्त करण्यास जबाबदार असलेल्या माणगांव शहरातील त्या गौरी लाॅजवर तुम्ही का कायदेशीर कारवाई केली नाही. असे माणगांव मधील पत्रकारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शशिकिरण काशिद यांना विचारले असता ते म्हणाले की, या प्रकरणी आमचा अधिक पोलीस तपास सुरू असून संबंधित गौरी लाॅजवर सुद्धा कायदेशीर कारवाई होणार असे माणगांवचे कर्तव्य दक्ष आणि कर्तव्य कठोर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शशिकिरण काशिद यांनी पत्रकारांना ग्वाही दिली आहे.