Home गुन्हा संकेतस्थळावर डॉक्टर असल्याची बतावणी करूत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून साडेचार लाख शिताफीने उकळणाऱ्या एका भामट्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

संकेतस्थळावर डॉक्टर असल्याची बतावणी करूत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून साडेचार लाख शिताफीने उकळणाऱ्या एका भामट्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0

संकेतस्थळावर डॉक्टर असल्याची बतावणी करूत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून साडेचार लाख शिताफीने उकळणाऱ्या एका भामट्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

‘शादी डॉट कॉम’ या संकेतस्थळावर अनेकजण भावी पत्नी किंवा पतीचा शोध घेत असतात. तेथे तरी आपल्याला जीवनसाथी मिळेल अशी आस लावून असतात. पण याचाच काही भामटे गैरफायदा उचलतात.  हैदराबाद येथील एका भामट्याने डॉक्टर असल्याची बतावणी करून कुर्ल्यातील महिलेला लग्नाचे आमिष दाखवले.  लग्नाची खरेदी करायचे सांगून तिच्याकडून साडेचार लाख शिताफीने उकळले. पण त्याची भामटेगिरी उघड झाली आणि  नेहरू नगर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

मंदाकिनी (36, नाव बदललेले) या घटस्फोटित असून त्या दुसरे लग्न करण्याच्या प्रयत्नात होत्या. एका कंपनीत रिसेप्सनिस्टचे काम करणार्‍या मंदाकिनी यांनी शादी डॉट कॉमवर नाव नोंदणी केली होती. तेथे आरोपी श्याम मोहन मच्छरेला (46) याने देखील नाव नोंदवले होते. डॉक्टर असून घटस्फोटित महिलेशी लग्न करायच्या तयारीत असल्याचे श्यामने प्रोफाईलमध्ये म्हटले होते. दरम्यान हैदराबादचा असलेल्या श्यामने मंदाकिनी यांना संपर्प केला आणि तुमच्याशी लग्नासाठी तयार असल्याची बतावणी केली. आपल्याला डॉक्टर पती मिळणार या आशेने मंदाकिनी यांनीदेखील त्याला पटकन हो बोलून टाकले. त्यानंतर दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. श्यामला भेटायला मंदाकिनी हैदराबादलादेखील गेल्या. तेथे दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. शिवाय महिनाभरात लग्नाच्या तयारीसाठी त्याने मंदाकिनीकडून साडेचार लाख उकळले. त्यानंतर त्याने तिला टाळण्यास सुरुवात केली.

पैशासाठी आल्याने पोलिसांच्या जाळ्यात

श्यामचे खरे रूप समजताच मंदाकिनी यांनी नेहरू नगर पोलिसात जाऊन तक्रार दिली. मग वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे, पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी तपास सुरू केला. पोलिसांच्या मार्गदर्शनानुसार मंदाकिनी यांनी पैशाचे गाजर दाखवून श्यामला मुंबईत बोलावले. त्यानुसार तो मुंबईत येताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली.