Home बातम्या महत्वाच्या बातम्या दोन जुन्या अनमोल मूर्ती विकण्यासाठी घेऊन येणाऱ्या 3 संशयित आरोपींना पोलिसांनी केली अटक

दोन जुन्या अनमोल मूर्ती विकण्यासाठी घेऊन येणाऱ्या 3 संशयित आरोपींना पोलिसांनी केली अटक

0

दोन जुन्या अनमोल मूर्ती विकण्यासाठी घेऊन येणाऱ्या 3 संशयित आरोपींना पोलिसांनी केली अटक

बारामुखी विष्णू आणि लक्ष्मीच्या जुन्या मूर्ती घेऊन काही संशयित आरोपी रायगडमधील अलिबाग येथील मांडवा परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक मांडवी पोलिसांच्या सहकार्याने इनोव्हा गाडीसह तिघा संशयितांना अटक केली आणि त्यांना मांडवी पोलिसांच्या ताब्यात दिले. रायगड जिल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे एक पथक नौपाडा पोलीस ठाण्यातील एका गुन्हे प्रकरणात तपास करत असताना अलिबाग येथे पोहचले. या प्रकरणात आरोपींचा शोध घेत असताना त्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन जुन्या अनमोल मूर्ती विकण्यासाठी काही व्यक्ती सारळ पूल, गोकुळ ढाबा अलिबाग येथे येणार आहेत. त्यावेळी अलिबाग पोलिसांच्या मदतीने सापळा रचण्यात आला. त्यावेळी एका पांढर्‍या रंगाच्या इनोव्हा गाडीतून आलेल्या 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या गाडीत तपासणी केली असता त्यांच्याकडे 12 मुखी भगवान विष्णूची 8 किलो 700 ग्रॅम वजनाची आणि 6 किलो 827 वजनाची लक्ष्मीची आणखी एक पुरातन मूर्ती मिळाली. गुन्हे शाखेने संयुक्तपणे कारवाई करून या मूर्ती जप्त केल्या आहेत.