Home गुन्हा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या इसमाला कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या इसमाला कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद

0

देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या इसमाला कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद

भूषण गरुड :कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना कोंढवा खुर्द येथील प्रतिभाताई शाळे समोरील मल्हार चौकात एक इसम पिस्टल व जिवंत काडतुस घेवुन येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून साजिद रेहमान सय्यद 25 वर्षीय संशयित इसमाला एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे शहरात विधानसभा निवडणूक 2019 च्या अनुशंघाने सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2019 रोजी पोलीस शिपाई आदर्श चव्हाण व उमेश शेलार हे पोलिस ठाणे हद्दीत गस्त घालत असतांना. पोलीस शिपाई आदर्श चव्हाण यांना त्यांच्या बातमीदार मार्फत कोंढवा खुर्द येथे प्रतिभाताई शाळे समोरील मल्हार चौकात एक इसम पिस्टल व जिवंत काडतुस घेवुन येणार असल्याची खबर मिळाली. त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती कोंढवा पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे व पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांना कळवत वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उप निरीक्षक संतोष शिंदे, तपास पथकातील पोलीस कर्मचारी यांनी बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी सापळा रचुन संशयित इसम साजिद रेहमान सय्यद (वय 25, रा.राजीव गांधी नगर झोपडपट्टी,साळुखे विहार, मुळ गाव-बुराहपुर,उत्तरप्रदेश) यास शिताफीने ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचे  पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असे मिळुन आले. सदर पकडलेल्या आरोपी विरूध्द कोंढवा पोलीस ठाणे गु.र.क्र. 784 /19 आर्म अँक्ट 3(25), 37(1) व 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


साजिद रेहमान सय्यद याकडे मिळून आलेले देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस त्याने काशासाठी आणले, त्याला कुठून उपलब्ध झाले, त्याचा कुठल्या गुन्ह्यांशी काही संबंध आहे का याचा खुलासा होण्यासाठीचा पुढील तपास कोंढवा पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी,
अप्पर पो.आयुक्त पु.प्र.विभाग सुनिल फुलारी, पोलीस उपआयुक्त परिमंडळ 5 सुहास बावचे, सहा.पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे सुनील कलगुटकर, कोंढवा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, पोलीस शिपाई आदर्श चव्हाण, उमेश शेलार व तपास पथकातील पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.