Home गुन्हा तुळींज पोलीस ठाणे यांचेकडुन २.२०० कि.ग्रॅम वजनाचा गांजा जप्त

तुळींज पोलीस ठाणे यांचेकडुन २.२०० कि.ग्रॅम वजनाचा गांजा जप्त

0

तुळींज पोलीस ठाणे यांचेकडुन २.२०० कि.ग्रॅम वजनाचा गांजा जप्त

शफिक शेख दि.०१/१०/२०१९ रोजी २३.३० वाजताचे सुमारास तुळींज पोलीस ठाणे हद्दीतील तांडापाडा, संतोषभुवन, नालासोपारा पुर्व येथे यातील आरोपीत नामे १) हैदर अकबर शेख, वय २५ वर्षे, रा.तांडापाडा संतोषभुवन नालासोपारा पुर्व याने आपल्या स्वताच्या ताब्यातील नालासोपारा पुर्व येथे ३३,०००/- रुपये किंमतीचा २ किलो २०० ग्रॅम वजनाचा १ निळया रंगाची प्लॅस्टीक पिशवीमध्ये हिरवट काळपट पाने, सफेद बिया असलेला ओलसर उग्र वासाचा गांजा नावाचा अंमली पदार्थ गैरकायदेशीरपणे आपले कब्जात विक्री करीता जवळ बाळगले असतांना मिळुन आला. आरोपीत यांचे विरुध्द तुळींज पोलीस ठाणे गु.र.न. ॥ १०८४/२०१९ एन.डी.पी.एस अॅक्ट १९८५ चे कलम ८ (क), २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई श्री. मांडवे उप विभा. पो. अधिकारी, नालासोपारा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधि. दत्तात्रय पाटील, तुळींज पोलीस ठाणे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.