Home ताज्या बातम्या श्री के वेंकटेशंम पुणे शहराचे संवेदनशील पोलीस आयुक्त

श्री के वेंकटेशंम पुणे शहराचे संवेदनशील पोलीस आयुक्त

0

श्री के वेंकटेशंम पुणे शहराचे संवेदनशील पोलीस आयुक्त

गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ असणारे आणि नागरिकांच्या प्रश्नावर अत्यंत भावनिक,संवेदनशील असलेले व आपुलकीने चौकशी करणारे असे व्यक्तिमत्व आज समोर आले

असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट च्या वतीने माननीय पोलीस आयुक्त यांची आयुक्त कार्यालयात भेट घेण्यासाठी असोसिएशन चे शिष्टमंडळ म्हणून गेलो होतो भाडेकराच्या टेन्ट इन्फॉर्मेशन संदर्भातील अडीअडचणी ह्या विषयात आयुक्त साहेबांना पत्र देण्यासाठी त्यांची भेट घेतली सुरुवातच सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणी हे असल्याने आयुक्तसाहेब मराठीत संवाद साधू लागले सर्व विषय त्यांनी व्यवस्थित समजून घेतला त्वरित आपल्या कनिष्ठांना आदेश देऊन आरटीओ आणि सोसायट्यांसाठी परिपत्रक बनवून त्याची पीडीएफ असोसिएशनच्या नावाने पाठवावी असे आदेश दिले काम संपले आणि आम्ही निघण्याच्या तयारीत होतो साहेबांनी आम्हाला बसण्याची खूण केली आणि विचारले कसा चालू आहे व्यवसाय काय म्हणते प्रॉपर्टी मार्केट मार्केटमध्ये मूव्हमेंट आहे का आम्ही ग्राउंड वर काम करत असल्याने त्यांनी सर्व परिस्थिती विचारपूस केली. आमची त्यांना भेटण्याची दुसरी वेळ नागरिकांच्या प्रश्नावर आम्ही त्यांची भेट घेतल्याने त्यांना आनंद झाला 2013 पासून वेबसाईटमध्ये बदल न झाल्याचे सांगितल्यावर त्यांनी त्वरित साइटवर करेक्शन करून त्वरित नवीन आदेश पारित करण्याची सूचना केली नागरिकांना पोलीस इन्फॉर्मेशन साठी व वेरिफिकेशन साठी पोलीस चौकीत चक्कर मारायला लागू नये हा विषय मी पुण्याची सूत्रे हातात घेतली तेव्हाच ठरवले होते असे आयुक्त साहेबांनी स्पष्ट केले पोलिसांनी मधला माणूस आणि नागरिकांच्या प्रती असलेली संवेदनशील भावना त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती निघताना आम्ही त्याना उत्तम संवादा बद्दल धन्यवाद केले,पुणे शहराला अत्यंत उत्तम आयुक्त श्री व्याकटेशम ह्याच्या रूपाने लाभले आहेत धन्यवाद सर

सदर शिष्टमंडळात असोसिएशन चे अध्यक्ष सचिन शिंगवी ,सचिव राजेंद्र दोशी, कैलास फोफालिया अँड हरीश खर्डेकर सहभागी होते