Home ताज्या बातम्या पुणे शहरात अधिकृत आणि परवानाधारक खाजगी सुरक्षा संस्थेला सर्वच ठिकाणी मोठी मागणी

पुणे शहरात अधिकृत आणि परवानाधारक खाजगी सुरक्षा संस्थेला सर्वच ठिकाणी मोठी मागणी

0

पुणे शहरात अधिकृत आणि परवानाधारक खाजगी सुरक्षा संस्थेला सर्वच ठिकाणी मोठी मागणी

पुणे : परवेज शेख पुणे शहराचे चेहरामोहरा बदलणारे, कर्तव्यदक्ष व अतिसंवेदशील आणि अत्याधुनिक गोष्टींचा वापर करणारे तसेच विविध समाजोपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे, सर्वच क्षेत्रातील गुन्हेगारी संपविण्याचा विडा उचललेले तसेच गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेले, पुणे शहरातील पोलीस ठाणे स्मार्ट करण्यावर भर देणारे पोलीस आयुक्त मा. डॉ. के.वेंकेटेशम साहेब यांनी गेल्या एका वर्षात शहरात मोठ्या प्रमाणावर कायदा-सुव्यवस्था राखण्यासंबंधी कठोर पावले उचलेले दिसून आली. त्यात त्यांनी स्मार्ट पॉलिसींग सोबत स्मार्ट प्रायव्हेट सेक्युरिटी एजेन्सी हि होताना दिसत आहेत.

पुणे पोलीस आयुक्तालयातून महाराष्ट्राच्या इतिहासातील नियोजनबद्ध आणि निर्णयात्मक खाजगी सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या मालकांना सोबत घेऊन त्यांच्याच सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी पोलीस प्रायव्हेट सेक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम (पी-४) हा उपक्रम चालू केला आणि संपूर्ण शहरात त्याचे पडसाद उमटलेले दिसत आहे.
पी-४ च्या निर्मिती आणि नियोजनामुळे एक मोठे सुरक्षा अभियान चालू झाले त्यात सुरक्षितेबद्दल ची आवड,मालकांच्या जबाबदाऱ्या,कर्तव्य,कायदे,शहराच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे सुरक्षा रक्षकांचे जाळे आहे तिथे तिथे पोहचले त्या रक्षकांनाही मानाचे स्थान सर्वच आस्थापनेत मिळायला सुरुवात झालेली दिसून येते आहे.

पोलीस आयुक्तांनी पहारेकरी नावाची संकल्पना इतिहास जमा केली. प्रशिक्षित आणि कर्तव्यदक्ष सुरक्षा रक्षकाला खासदूत आणि खाजगी अधिकारी वर्गाला विशेष पोलीस दूत म्हणून गौरवण्यात आले त्याचे मोठे स्वरूप ९ ऑगस्ट २०१९ च्या पहिल्या वाहिल्या चालक आणि मालक बैठकीदरम्यान दिसले त्यावेळी पुण्यातील खाजगी सुरक्षा पुरविणाऱ्या अंदाजे १००० मालकांपैकी नामांकित जवळपास ४०० हुन अधिक मालकांनी हजेरी लावली. एकाच वेळी एवढे मालक व चालक येण्याची वेळ होती त्या बैठकीदरम्यान पोलीस आयुक्त, डॉ . के. वेंकटेशम (भापोसे), मा. पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे (भापोसे), मा. अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) अशोक मोराळे (भापोसे), मा. अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. संजय शिंदे (भापोसे), मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे बच्चन सिंग (भापोसे) व सर्व पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते त्यावेळी समन्वयक पो.नि श्री लकडे आणि भारत शिल्ड फोर्स प्रा.ली चे संस्थापक सचिन मोरे यांच्या पुढाकारातून झाले.

या कार्यक्रमादरम्यान मंचावरील सर्व सन्मानीय मान्यवरांनी खास करून पोलीस आयुक्त साहेबांनी सखोल चर्चा करून शेकडो प्रश्नांची उत्तरे दिली आणि या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केले आणि मा. पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे, मा. अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) अशोक मोराळे, मा. अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. संजय शिंदे या मान्यवरांनी उपस्थितांना संबोधीत करून सर्वांची मने जिकूंन त्यांना आशावाद दिला.

जे चालक व मालक परवाना असूनही कायदे पाळत नाही या उलट आयुक्तांनी दिलेल्या परवान्यांचा गैरवापर करतील,शासनाच्या कलमाचे उल्लंघन करतील किंवा कायदा हातात घेतील तसेच कामगार आणि पसारा कायद्याच्या तरतुदीनुसार कामकाज न करता शासनाची आणि पोलीस प्रशासनाची दिशाभूल करून माहिती लपवून व्यवसाय करतील त्यांना इशारा दिला आणि अशा चालक मालकांवर पसारा २००५ नुसार कारवाई करून त्याचे परवाना रद्द केले जातील असे सांगण्यात आले.

जे सुरक्षा ठेकेदार म्हणून माहिती लपवतात त्यांना हि तंबी बसावी व कायदा सुव्यवस्था चे व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येक्ष प्रत्येक पोलीस ठाण्यांशी खाजगी सुरक्षा पुरवणाऱ्या चालक मालक आणि कर्मचाऱ्यांना लेखी आणि व्हॉट अँप ग्रुप निर्माण करून त्यांना जोडण्यात आले. त्यामुळे विनापरवाना करणाऱ्यांना धडकी भरली.

या गोष्टींमुळे शहरात सर्व मालकांना एका समसमान धोरणावरती आणले आणि सर्व परवानाधारक मालकांमध्ये एक विश्वास निर्माण केला कि कोणीही लहान-मोठा नाही सर्वांना कर्तव्य व जबाबदाऱ्या शासकीय नियमानुसार पार पडायला भाग पाडले. त्यातून हि त्यांनी या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करीत स्मार्ट ( SMART) या आधारावर कामकाज करायला सांगितले. Strict-Sensitive, Morden-Moblie, Alert-Accountable, Reliable-Responsive, Techno-Sevvy, Team-Trained या स्मार्ट पद्धतीने खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी अंगी बाळगताना सर्सास दिसायला सुरुवात झाली आहे.

काही खाजगी रक्षक पुरवणाऱ्या मालकांना विचारले असता त्यांनी सांगितले कि या दोन (२) महिन्यात पोलीस प्रायव्हेट सेक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम (पी-४) मुळे या कार्यक्षेत्रात कमालीचा बदल झाला बातम्या आणि माहिती वरून विनापरवाना कामकाज करणाऱ्या संस्था, इव्हेंट मॅनॅजमेण्ट करणाऱ्या कंपन्या ( जे विनापरवाना बॉऊन्सर्स आणि बॉडी गार्डस,VIP प्रोटेक्शन ) तसेच परवाना असूनही बेकायदेशीर व शासनाच्या अनेक नियमांचे नियम पायदळी तुडविणारे, सर्सास उल्लंघन करणारे आणि गॉड फादरचे नाव सांगून दहशत निर्माण करून जे गावगुंड जे धमक्या देऊन कामकाज पाहणारे सर्वच बेजबाबदार लोकांच्या आस्थापनेचा सुळसुळाट अचानक बंद होताना दिसतोय. जवळपास शॉप ऍक्ट वरती, विनापरवाना काम करणाऱ्या ठेकेदारांनी आपली कामे बंद करताना दिसत आहे ज्यांनी बंद केली नाहीत ते भीती पोटी चोरून व्यवसाय करताना दिसत आहे.

जी परवानाधारक संस्था शासनाचे नियमांचे कायदे पाळत नाहीत ते पी एफ, ई.एस.आय.सी, जी.एस.टी, व इतर शासकीय वेतन भत्ते न देता मुख्य प्रमुख नियुक्ता व चालक/मालक दोघेही मिळून त्यांच्याच कर्मचाऱ्यांचे पैसे चोरी करत किंवा लपवून खात होते त्यांना जबर धक्का आणि चपराक बसली त्यातून प्रमुख नियुक्ताने चालक/मालकासोबत केलेली अंतर्गत छुपी-युती अचानक चवट्यावर आल्याने बऱ्याच ठेकेदारांची (परवानाधारक संस्थेचे) कामे बंद झाली.

पी-४ च्या या उद्देशामुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करणारे आणि सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या जवळपास तीस हजाराहून (३०,०००) कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. सर्वांमध्ये नवचैतन्य निर्माण होताना दिसत आहे. त्यात पसारा २००५ चे नियम,कायदेशीर माहिती, सुधारित काम करण्याची पद्धती, निर्णयात्मक संस्था चालवणे, मालकांचे समज-गैसमज, मालकांच्या जवाबदाऱ्या, कामगार कायद्यानुसार तरतुदींचे पालन, रक्षकांची शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, विनापरवाना-एक गंभीर समस्या, प्रशासनाला वेठीस धरून फसवणे किंवा दिशाभूल करणे याचे दुष्परिणाम या विषयांचे आकलन आले असे काही मालकांनी पुढे येऊन सांगितले.

सुरक्षा विषयक पोलीस ठाण्यांतर्गत होणाऱ्या मासिक मीटिंग मुळे बरीच माहिती पोलीस प्रशासनाला प्रत्येक्ष आणि अप्रत्येक्ष मिळायला सुरुवात झाली आहे. बीट मार्शल, दामिनी पथक यांना सुरक्षा रक्षक माहिती देताना पुढे येत आहेत. गस्ती मध्ये सुरक्षा रक्षकाला प्रशिक्षण चालू झाल्याने पोलीस आणि रक्षक यांच्यात मैत्रीचे संबंध तयार होऊ लागले आहेत. त्यात हि या गणपती विसर्जनाला सर्वच पोलीस ठाण्यांतर्गत स्व-इच्छेने मालकांनी २००हून अधिक स्वयंसेवक म्हणून सुरक्षा रक्षकांना बंदोबस्तामध्ये काम करताना दिसले होते.

पी-४ च्या या उपक्रमाविषयी काही रक्षकांना विचारले असता त्यांनी सांगितले कि पहिला आम्हांला एकच युनिफॉर्म मिळायचा आता दोन मिळाले आहेत, कामकाजात गती वाढली, आमची कागदपत्रे घेयला सुरवात केली, आम्हांला ट्रैनिंग मिळायला लागले व प्रमाणपत्रे, चारित्र्य पडताळणी अहवाल हि मिळायला लागले आहेत.

सप्टेंबर पासून आम्हांला पी.एफ आणि ई .एस.आय.सी व इतर वेतन भत्ते मिळायला चालू झाले आहेत.
पी-४ च्या काही निवडक मालकांनी प्रमुख नियुक्त्याने काम दिले पण करारपत्र किंवा वर्कऑर्डर देत नाहीत आणि अचानक काम बंद करून पैसे बुडवतात अशा प्रमुख नियुक्त्याची यांची यादी त्या आस्थापनेच्या मालकाचे आणि त्याच्या पार्टनरची नावे घोषित करून यांना सुरक्षा देणे बंद केले आहे तसेच त्या व्यक्तीला सार्वजनिकरित्या ब्लॅकलिस्ट केले जाते आहे, अशा बेजबाबदार व्यावसायिकाकडे सेवा देण्यापेक्षा सुरक्षाच त्यांना पुरवली जाऊ नये यावर भर दिला गेला आहे त्यात काही व्यवसायिक (प्रमुख मुख्य नियुक्ता) हि गुंड प्रवृत्तीने धमकावणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. पी-४ चा एकसंघ कामकाज प्रणाली नित्य प्रमाणावर विकसित होताना दिसत आहे.

महाराष्ट्रातील इतिहासातील एकमेव घटना पुणे पोलीस यांच्या विकसित कार्य प्रणालीमुळे शक्य झाले ते म्हणजे पी-४ च्या माध्यमातून काही निवडक नामांकित २०० मालक समसमान एकाच व्यवसायात असून देखील एकमेकांना व्यवसाय वाढीकरिता, ट्रैनिंग, मॅनपॉवर मदत, पैसेचीही मदत, सल्लागार म्हणून जुन्या संस्था नव्या संस्थेला मदत करताना दिसून आले. जरी एकमेकांचे व्यवसायातील प्रतिस्पर्धी असूनही आठवड्याला एक मीटिंग घेताना दिसतात त्यात सर्वच गोष्टींचा तोडगा काढला जातोय व पोलीस मित्र म्हणून पुढे सरसावलेले दिसलेत.

अपर पोलीस आयुक्त मा.मोराळे साहेबामुळे चालक व मालक आणि सुरक्षा कर्मचारी यांच्या मध्ये कमालीचा बदल झालेला दिसतो आहे कारण गुन्हे आणि त्या संबधीची माहिती पुढे येताना दिसत आहे. समर्थता,सावधपणा, वृत्ती, सौजन्य, शिस्त, अनुकरणीय वर्तणूक, कल्पनाशक्ती, कर्तव्यबाबत आस्था, निष्ठा, चातुर्य, यावर भर दिला जात आहे. त्यात घातपाती किंवा हेरगिरीची, विघातक कृत्ये, सुरक्षितेच्या नियमांचे उल्लंघन, मादक व अंमली पदार्थावर करडी नजर, गैरवर्तणूक, अनैतिक किंवा असभ्य वर्तवणूक, धांगडधिंगा, दृष्ट बुद्धीने केलेल्या खोड्या, अफवा, रात्रीचे मद्यधुंद पार्ट्या, मोठ्या आवाजातील नाचगाणे ..इ यावर अमंलबजावणी करताना दिसत आहेत. तसेच चोऱ्यांवर नियंत्रण आणण्यावर भर दिला

महत्वाचे म्हणजे जे रक्षक हेच भक्षक बनवून काम करत होते ते या भीतीने पळून जायला लागले आहेत कि शासनदप्तरी कागदपत्रे दिल्याने अडचणी वाढतील म्हणून शहरातून शेकडोहून अधिक भक्षक पळालेले काहींनी खाजगीत सांगितले.
काही आस्थापनेत महिलांची संख्या कामगार म्हणून जास्त आहे तिथे महिला सुरक्षा रक्षक नेमल्याने महिला कामगार वर्गाला शोषणाविरुद्ध आवाज उठवायला सोबती मिळाला आहे.

पुणे शहरातील नामांकित सुरक्षा संस्थेच्या मालकांनी सांगितले कि आमच्या परवान्यावरती मा. पोलीस आयुक्तांची सही आहे आणि त्यांनी दिलेल्या परवान्यानूसार कामकाज करून व्यवसायातून उदरनिर्वाह करत आहोत तर त्यांच्या नावाला कसलाही धक्का न लावता या व्यवसायात शासकीय नियमांना धरून व्यवसाय करू आणि उत्तरदायत्वाची भावना म्हणून शहरात कायदा व सुव्यस्था राखण्यासंबंधी आणि सभोवतालच्या परिसरात गुन्हा घडू नये किंवा जर घडला त्या संबंधीचे तसेच गर्दी,आपत्ती, वाहतूक, विशेष सुरक्षा व्यवस्थापन व रक्षण,निरीक्षण आणि गस्त यांचे तसेच तपास,शोध प्रक्रिया व सुरक्षा उपकरणे हाताळणे संबधीचे ट्रैनिंग पी-४ च्या माध्यमातून खासदुत/पोलीस विशेष दूत यांना प्रात्यक्षिकसह तयार करून ठेवले आहेत, गरज भासल्यास विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी अथवा मतमोजणीच्या वेळी अंदाजे २००-३०० स्वयंसेवक पी-४ च्या माध्यमातून तैनात करण्यासाठी सज्ज आहे.

पोलीस यांच्या विकसित कार्य प्रणालीमुळे शक्य झाले ते म्हणजे पी-४ च्या माध्यमातून काही निवडक नामांकित २०० मालक समसमान एकाच व्यवसायात असून देखील एकमेकांना व्यवसाय वाढीकरिता, ट्रैनिंग, मॅनपॉवर मदत, पैसेचीही मदत, सल्लागार म्हणून जुन्या संस्था नव्या संस्थेला मदत करताना दिसून आले. जरी एकमेकांचे व्यवसायातील प्रतिस्पर्धी असूनही आठवड्याला एक मीटिंग घेताना दिसतात त्यात सर्वच गोष्टींचा तोडगा काढला जातोय व पोलीस मित्र म्हणून पुढे सरसावलेले दिसलेत.