Home गुन्हा खोटे लग्नाचे आमिष देवून तोतया आय.ए.एस अधिका-यास अटक

खोटे लग्नाचे आमिष देवून तोतया आय.ए.एस अधिका-यास अटक

0

खोटे लग्नाचे आमिष देवून तोतया आय.ए.एस अधिका-यास अटक

पुणे : परवेज शेख दि.०३/१०/२०१९ रोजी प्राप्त तक्रारी अर्जाचे अनुषंगाने इसम नामे दिपांकर जळभाजी भद्रे वय ३८ वर्षे धंदा खाजगी नोकरी रा. जे.जे. नगर, लेन नं. ४, श्रीकांत देशमुख याचे घरी


भाडेकरु, केसनंद रोड, वाघोली, पुणे मुळपत्ता नालंदानगर, प्लॉट नं. ४, सांगवी रोड, तरोड (बु.) जिल्हा नांदेड ४३१६०५ यने, तो स्वतः आय.ए.एएस. अधिकारी नसल्याचे माहित असूनही, त्याने स्वतः आय.ए.एस. अधिकारी असल्याचे भासवुन व सदर पदाचा
वापर करुन, तो स्वतः विवाहीत असूनही ते लपवुन त्याने स्वतःचे लग्नासाठी जीवनसाथी डॉट कॉम या लग्न जुळविणा-या वेबसाईटवर स्वतःची माहिती देऊन, त्याद्वारे विवाहास इच्छुक असणारे अनेक मुलींशी संपर्क साधून स्वतः आय.ए.एस. अधिकारी असल्याची
बतावणी करुन त्यांचेशी लग्नाची बोलणी करून सदर मुलींची सोशल
मिडीयाचा गैरवापर करुन फसवणूक केली असलेचे व स्वतःजवळ बनावट छोटे एअरगन बाळगली असलेचे निष्पन्न झालेने, त्याचेविरूध्द सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा पुणे
येथील महिला पोलीस उपनिरीक्षक सौ. प्रिया सुधाकर टिळेकर यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालावरून खडकी पोस्टे पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात
त्यास दि.०३/१०/२०१९ रोजी अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त मा.श्री.अशोक मोराळे साो, पोलीस उपायुक्त मा.श्री.बच्चनसिंह सो सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.शिवाजी पवार सो.यांचे मार्गदर्शना खाली खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक,पश्चिमचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते,पोलीस उपनिरीक्षक निलेश महाडीक,महिला पोलीस उपनिरीक्षक सौ.प्रिया
सुधाकर टिळेकर,पोलीस कर्मचारी प्रमोद मगर,संतोष मते,शिवानंद बोले, सचिन कोकरे, फिरोज बागवान, हनुमंत गायकवाड यांनी केली आहे.