मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघाताची घटना दुःखदायक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली नसरापूर घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट – महासंवाद
- Advertisement -





मृतांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी; जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश

मुंबई, दि. ९ : मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी झालेल्या भयंकर अपघातामुळे मी खूप व्यथित झालो आहे. रोज सकाळी हजारो प्रवासी या मार्गावरून ये-जा करतात. ही अतिशय दुःखदायक घटना आहे. मी मृतांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. जखमींवर तातडीने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश ठाणे आणि कळवा येथील रुग्णालयांना  दिले आहेत. मी स्वतः देखील डॉक्टरांशी बोललो आहे.

रेल्वे मार्फत या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे ही अतिशय दुर्दैवी घटना असून नेमका अपघात कशामुळे झाला हे या चौकशीतून लगेच सामोरे येईल.

0000







- Advertisement -