Home ताज्या बातम्या इमारतीच्या पार्किंगमधील 11 दुचाकी जाळल्या

इमारतीच्या पार्किंगमधील 11 दुचाकी जाळल्या

0

इमारतीच्या पार्किंगमधील 11 दुचाकी जाळल्या

पुणे : परवेज शेख पुण्यातील दांडेकर पुलाजवळील इमारतीतील 11 गाड्या जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. 

दांडेकर पुलाजवळील सिंहगड रोडवरील साने गुरुजी शाळेसमोर विघ्नहर्ता ही इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किगमध्ये गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या. पहाटेच्या सुमारास त्यांना कोणीतरी आग लावून दिली. 

 1 वाजून 52 मिनिटांनी अग्निशमन दलाला याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने दोन गाड्या घटनास्थळी पाठविल्या. त्यांनी काही मिनिटातच ही आग विझविली. 

 11 गाड्यांना आग लागली. त्यामध्ये 6 दुचाकी, एक रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाल्या. तर 4 दुचाकींना आगीची झळ लागली. 

गेल्या काही वर्षांपासून पार्क केलेल्या गाड्यांना आगी लावल्याचे सुरू असलेले लोण काही केल्या थांबताना दिसत नाही. ही आगही कोणीतरी जाणीवपूर्वक लावल्याचा संशय आहे.