Home बातम्या योगींची कन्या पूजा; पत्रकार म्हणते, एक दिवस कन्या पूजा, बाकी दिवस ‘चिन्मयानंदा’चे रक्षण

योगींची कन्या पूजा; पत्रकार म्हणते, एक दिवस कन्या पूजा, बाकी दिवस ‘चिन्मयानंदा’चे रक्षण

0

लखनऊ: दसऱ्याच्या निमित्ताने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 51 लहान मुलींचे पाय धुऊन त्यांची पूजा केली. यातून त्यांनी महिला सशक्तीकरणाचा नारा दिला. मात्र, त्यांच्या या कृतीवर पत्रकार रोहिनी सिंग यांनी टीका केली आहे. योगींची कृती ढोंगीपणाची असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

वर्षातून एकदा लहान मुलींची पूजा आणि त्यानंतर वर्षभर स्वामी चिन्मयानंद यांच्या सारख्यांचे रक्षण करणे. योगी सरकारने हा तमाशा बंद करायला हवा. भाजप नेत्यांवर बलात्काराचे गुन्हे आहेत. मात्र सरकार त्यांना शिक्षा देण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत आहे, अशी टीका रोहिणी यांनी केली आहे.

उन्नाव गैंगरेपमधील आरोपी भाजपचे निष्कासित आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि शाहजहांपूरात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणी आरोपी असलेेले भाजपचे वरिष्ठ नेता स्वामी चिन्मयानंद यांना सरकार संरक्षण देत आहे, असा आरोप रोहिनी सिंग यांनी केला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी 51 लहान मुलींचे पुजन केले. त्यानंतर त्यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा दिला. भाजप सरकार महिला सशक्तीकरणासाठी कटिबद्ध आहे. लवकरच कन्या सुमंगला योजना आणणार असल्याचे योगी यांनी यावेळी जाहीर केले.