मुंबई : शफीक शेख
नौपाडा पोलीस स्टेशन गु. र.नं. 285/2019 भादवि कलम 392,34 प्रमाणे दिनांक 11/09/2019 रोजी 14.09 वा दाखल असून सदर गुन्ह्यातील हकीगत अशी की, यातील तक्रारदार या 72 वर्षाच्या वयोवृध्द असून त्या सकाळी आपल्या नातवास क्लास वरुन परत येत असताना संदिप अपा. चरई, ठाणे या ठिकाणी एका

दुचाकीवरुन दोन अनोळखी इसमांनी त्यांचा पाढलाग करुन त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन खेचून नेल्याबाबत तक्रार होती. त्या अनुषंगाने सदर ठिकाणचे सिसिटीव्ही फुटेज व तांत्रीक माहितीच्या आधारे आज रोजी सदर गुन्ह्यातील चालक असणारा आरोपीत नामे अजुद्दीन सिराज शेख, वय 37 वर्षे, यास सदर गुन्ह्यात वांगणी परीसरातून त्यास ताब्यात घेवून त्यास पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली असून त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाच्या आदेशाने ४ आक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडी मिळाल्याने त्याने गुन्ह्यातील जबरी चोरी करुन नेलेली अंदाजे २७ ग्राम वजनाची सोन्याची चैन व एक होन्डा युनिकाँर्न मोटारसायकल असे एकुण १,२०,००० रु किमतीचा मुद्देमाल त्याचे कडून जप्त केली आहे. तरी आरोपी कडे अधिक तपास करुन त्याचे कडे त्याने इतरत्र कोठे गुन्हे केले अगर कसे या बाबत अधिक तपास करुन गुन्हे उघड आणण्याची तजवीज ठेवली आहे. सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त सो।, परी. १ मा.बुरसे साहेब, स.पो.आ.पाडवी मँडम, मा. वपोनि मांगले साहेब, मा. पोनि गुन्हे क्षिरसागर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि मोरे व पो. उप निरी विनोद लभडे यांचे पथकाने केली आहे.
























WhatsApp