Home गुन्हा दादरा अॅन्ड नगर हवेली बनावटीची दारु विक्री करणा-या आरोपीतांवर कारवाई

दादरा अॅन्ड नगर हवेली बनावटीची दारु विक्री करणा-या आरोपीतांवर कारवाई

0

बनावटीची दारु विक्री करणा-या आरोपीतांवर कारवाई

विरार पोलीस ठाणे यांचेकडुन गावठी दारु तयार करणा-या व घोलवड पोलीस ठाणे यांचेकडुन दादरा अॅन्ड नगर हवेली बनावटीची दारु विक्री करणा-या आरोपीतांवर कारवाई दि. ०८/१०/२०१९ रोजी

१७.३० वाजताचे सुमारास विरार पोलीस ठाणे हद्दीतील मौजे भाटपाडा
येथील डोंगरालगत असलेल्या जंगल परिसरातील नाल्या लगत, विरार (पु), ता. वसई येथे कोणीतरी अनोळखीइसमांना अवैधरित्या गावठी दारु तयार करण्यासाठी हातभट्टी तयार करुन दारु पाडत होते. सदर ठिकाणावरुन एकुण ६०० /- रु. ची गावठी हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली असुन सुमारे गावठी बनावटीची दारु तयार करण्यासाठी लागणारे सुमारे ९५,३०० /- रु. चा माल व साहित्य जागीच नष्ट करण्यात आला आहे. म्हणुन आरोपीत याचे विरुध्द विरार पोलीस ठाणे गु.र.नं. ा ९४४/२०१९ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अनिल दबडे, प्रभारी अधिकारी, विरार पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

तसेच घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील दोन वेगवेगळया ठिकाणी यातील आरोपीत मजकूर याने १) १४,६८८/- रुपये किंमतीची प्रोव्हिशन गुन्हयाचा किंगफिशर स्ट्राँग बिअरचे ९ बॉक्स त्यामध्ये एकुण २१६ टिन ५०० मिली क्षमतेची बिअर, २)१०८८ – ०० रुपयेकिमतीच्याइंम्प्ररिअल ब्लु नावाचे लेबल असलेल्या त्यावर फोर सेलइनदादरा ॲड नगर हवेली लिहलेल्या १७ काचेच्या बाटल्या प्रत्येक बाटली १८० मिली असुन प्रत्येक बाटलीचीकिंमत ६४ कि.सु. ३)११७० – ०० रुपयेकिमतीच्या ऑफीसरचॉईस ब्लु नावाचे लेबल असलेल्या त्यावर फोर सेलइनदादरा अॅड नगर हवेली लिहलेल्या १८ काचेच्या बाटल्या प्रत्येक बाटली १८० मिली असुन प्रत्येक बाटलीचीकिंमत ६५ कि.सु. असा एकुण १६९४६/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीत याचे विरुध्द महाराष्ट्र दारूबंदीअधिनियम १९४९चेकलम६५ (ई)प्रमाणे २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदरची कारवाई सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश सोनवणे प्रभारी अधिकारी, घोलवड पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली घोलवड पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.