Home ताज्या बातम्या बारामती पोलिसांची कामगिरी देशी-विदेशी दारू विक्री करणार्‍यावर केली कारवाई

बारामती पोलिसांची कामगिरी देशी-विदेशी दारू विक्री करणार्‍यावर केली कारवाई

0

पुणे : परवेज शेख बारामती : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बारामती पोलिसांनी देशी-विदेशी दारूविक्री करणार्‍यांवर कारवाई केली असून, त्यात १,६८,८६०/- रु.च्या दारूसाठ्यासह रोख रक्कम ८१,५२०/- असा एकूण २,५०,३८० रुपयांचा माल जप्त केला आहे.


दि. १० ऑक्टोबर रोजी बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना रांजणगाव येथे अवैध दारूविक्रीबाबत माहिती मिळाली असता त्यांनी दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्‍वर्य शर्मा, बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, रांजणगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना सदर ठिकाणी रेड करण्यास सांगितले. त्यानुसार ८ दारूविक्री करणार्‍या हॉटेल्सवर हॉटेल संदीप, अमित, एस १, तसेच रांजणगाव एमआयडीसी येथील हॉटेल मुक्ताई, सुजय, संतोष, न्यू संतोष धमाकावर एकत्रित छापा टाकून रेड केली असता तेथे वेगवेगळ्या कंपनीच्या ब्लेंडेर प्राईड, मॅकडोवेल व्हिस्की, रम, रॉयल स्टॅग, वोडका, टू बर्ग बियर, बुडवाईसर बियर व अशा इतर विदेशी व टँगो देशी दारूचा १,६८,८६०/- रु.चा देशी-विदेशी दारूचा अवैध माल, ६० बॉक्स व ८१,५२०/- रोख माल सापडला आहे. यात अक्षय कांबळे रा. ढोक सांगवी, रांजणगाव, शिरूर, अमित जायकर रा. निमगाव म्हाळुंगे, शिरूर, बाबासो पवार रा, ढोक सांगवी, रांजणगाव, शिरूर, अजिंक्य वाडकर रा रांजणगाव, शिरूर, बापू शिंदे रा. सदर, दत्ता सुरवसे रा, संतोषनगर, रांजणगाव, शिरूर, मानसकुमार जैना रा. रांजणगाव, शिरूर, आझाद टेकराम सिंग, रा. सदर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई पुणे पोलीस अधीक्षक संदिप पाटील, बारामती अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्‍वर्य शर्मा, बारामती क्राईम ब्रँच पथकाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, पोलीस नाईक स्वप्निल अहिवळे, पो. कॉ. दशरथ कोळेकर, विशाल जावळे, शर्मा पवार, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे हवालदार राजेंद्र जाधव, भिगवण पोलीस स्टेशनचे रियाज शेख, जलद कृती दलाचे १० पुरूष व ४ महिला जवान, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, हवालदार दादा चमनशेख, पोलीस नाईक प्रफुल्ल भगत, मंगेश थिगले यांनी केली.