Home गुन्हा भोर शिरवळ रोडवर येथे गावठी पिस्तूल व काडतुस घेऊन फिरणारा आरोपी जेरबंद

भोर शिरवळ रोडवर येथे गावठी पिस्तूल व काडतुस घेऊन फिरणारा आरोपी जेरबंद

0

पुणे : परवेज शेख (भोर शिरवळ) रोडवर येथे गावठी पिस्तूल व काडतुस  घेऊन फिरणारा आरोपी जेरबंद पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कारवाई आगामी निवडणूक २०१९ चे अनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक श्री.संदिप पाटील सो यांचे आदेशाने बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार, पाहिजे फरारी आरोपी पकडणेकामी


विशेष मोहिम राबवित असताना, दिनांक १९/१०/२०१९ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट सो यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे,
सफौ. दिलीप जाधवर, पोहवा राजू चंदनशिव, चंद्रकांत झेंडे, रवि शिनगारे, महेश गायकवाड, निलेश कदम, अमोल शेडगे नेमणुक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण
यांचे पथकास भोर पोलीस स्टेशनचे हद्दीत मौजे मौजे वडगाव डाळ, सायमाळ, भोर-शिरवळ रोड ता.भोर जि.पुणे येथे एक इसम त्याचे कमरेला गावठी पिस्टल लावून फिरत असल्याची बातमी मिळालेवरुन सदर पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी दिपक उर्फ मोगल्या बाळासाहेब पासलकर वय २७ वर्षे रा.कुरण बुा, वरचीवाडी ता.वेल्हा जि.पुणे यास एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस किं.रु.५०,४००/- असे
बेकायदेशीरपणे बाळगले असताना मिळून आलेने ताब्यात घेण्यात आलेले असून पुढील कारवाईकामी आरोपी व मुद्देमाल भोर पोलीस स्टेशनला जमा केलेला आहे.