Home गुन्हा बनावट शस्त्र परवाना बनवणाऱ्या लिपिकास अटक

बनावट शस्त्र परवाना बनवणाऱ्या लिपिकास अटक

0

पुणे : परवेज शेख बनावट शस्त्र परवाना बनवणाऱ्या लिपिकास अटक पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालय येथील शस्त्र परवाना शाखेतील तत्कालीन कनिष्ठ लिपीक १. अमर केशव पवार वय-३१वर्ष,रा-घर नंबर ६०,केसरकर पेठ,घोरपडे कॉलनी, सातारा, व शस्त्र परवानाधारक

२. राजेंद्र काशीनाथ भिंताडे वय-४०वर्ष व्यवसाय-शेती,रा-सर्व्हे नंबर ४४/०१, कृष्णकुंज बंगला, भिंताडेनगर, उंड्री, ता-हवेली, जि-पुणे यांनी आपआपसात संगनमत करून राजेंद्र भिंताडे यांनी कनिष्ठ लिपिक अमर पवार यांना रु. २५०००/-अर्थिक प्रलोभन देऊन अमर पवार यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता, बेकायदेशीर, जाणीवपूर्वक शस्त्र परवाना क्षेत्रवाढ करणे हे त्यांचे कार्यालयीन काम नसतानाही राजेंद्र काशिनाथ भिंताडे यांचे शस्त्र परवाना क्र. एफ-९१/२०१५ यावर खाडाखोड करुन भारतभर क्षेत्राची नोंद करून दिली व पोलीस आयुक्त कार्यालयाच्या शासकीय अभिलेखावर खाडाखोड करुन नोंद केली. तसेच शस्त्रपरवाना शाखेत यापुर्वी नेमणुकीस असलेले तत्कालीन शस्त्र परवाना लिपिक यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता, बेकायदेशीरपणे शस्त्र परवानाधारक महेश मते यांना त्यांचे शस्त्र परवान्याचे क्षेत्र संपुर्ण भारतभर व इतर शस्त्र परवानाधारक यांना शस्त्र परवान्याचे क्षेत्र संपुर्ण महाराष्ट्रभर कोणत्याही शासकीय विहित कार्यपध्दतीचा अवलंब न करता करून दिल्याचे निष्पन्न झालेने सदर बाबत श्री डॉ शिवाजी पवार सहाय्यक पोलीस आयुक्त,प्रतिबंधक गुन्हे शाखा पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बंडगार्डन पो स्टे गुरनं ३९३/२०१९ भादविक ४२०,४६५,४६७,४६८,४७१,३४ प्रमाणे दिनांक १०/१०/२०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयात वर नमुद दोनही आरोपी यांना अटक करण्यात आले असुन दाखल गुन्हयाचा पुढील तपास अरुण वायकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,युनिट-१ गुन्हे शाखा पुणे शहर हे करीत आहेत.