Home ताज्या बातम्या नरेंद्र मोदी उद्यापासून प्रचारात; मुंबईतील सभेने होणार सांगता

नरेंद्र मोदी उद्यापासून प्रचारात; मुंबईतील सभेने होणार सांगता

0

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारपासून महाराष्ट्रातील प्रचारात उतरणार आहेत. भाजप उमेदवारांसाठी ते चार दिवसात ९ सभा घेतील. जळगावच्या सभेने सभांना सुरुवात होणार असून, १८ तारखेला मुंबईतील सभेने सांगता होईल.
पंतप्रधानांच्या १३ आॅक्टोबर रोजी जळगाव व भंडाऱ्यातील साकोली येथे सभा होतील. नंतर १६ आॅक्टोबरला अकोला, पनवेल व परतूर येथे त्यांच्या सभा होतील. १७ आॅक्टोबर रोजी पुणे, सातारा, परळीत तर १८ आॅक्टोबरला मुंबईतही सभा होईल.

दौ-याचा कार्यक्रम
रविवार, १३ आॅक्टोबर :
जळगाव, साकोली (जि. भंडारा)
बुधवार, १६ आॅक्टोबर : अकोला , परतूर (जि. जालना), ऐरोली ( जि. ठाणे )
गुरुवार , १७ आॅक्टोबर :
परळी (जि. बीड), पुणे , सातारा
शुक्रवार , १८ आॅक्टोबर : मुंबई

राहुल रविवारी राज्यात : काँग्रेसचे नेते राहुल गांधीसुद्धा रविवार, १३ आॅक्टोबरपासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत. लातूर जिल्ह्यात औसा येथील सभेनंतर सायंकाळी मुंबईतील काँग्रेस उमेदवारांसाठी गांधी दोन सभा घेतील.