Home गुन्हा खवले जातीचे मांजर विकण्यासाठी आलेले तिघांना अटक

खवले जातीचे मांजर विकण्यासाठी आलेले तिघांना अटक

0

पुणे : परवेज शेख चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर अतिदुर्मिळ खवले मांजराची तस्करी करणा-या तीन इसमांना खवले मांजरासह ताब्यात घेवून दिले जीवदान. चंदननगर पो.स्टे. तपास पथकामध्ये काम करणारे पोना. ६९३१, तुषार आल्हाट यांना दि. १२/१०/१९ रोजी
बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, तीन इसम एक खवले मांजर विक्री करण्याकरता प्राईड हॉटेल मागे मोकळया जागेत खराडी बायपास रोड, पुणे येथे येणार आहेत.

, सदरची बातमी मिळाली की पोना. तुषार आल्हाट यांनी लागलीच व. पो.निरी. – शंकर खटके यांना दिली. बातमीनुसार वपोनि. शंकर खटके यांनी लागलीच तपास पथकाचे सपोनि. गजानन जाधव, पोहवा. अजित धुमाळ, पो.हवा. राजेद्रं दिक्षीत,पो.हवा.श्रीकांत गांगुर्डे, पोना. दत्ता शिंदे, पो.ना.अमित जाधव, पोना. शकुर पठाण, पोशि. परशराम शिरसाट, पोशि. सुभाष आव्हाड अशा स्टाफच्या दोन टिम करुन सापळा लावणेसाठी मार्गदर्शन केले. त्यांनी सदर ठिकाणी १२/४५ वा. चे सुमारास सापळा लावुन बातमीप्रमाणे सदर  वर्णनाचे इसम १३/०५ वा. च्या सुमारास एक मोठी बॅग घेवुन त्यामध्ये काहीतरी जड वस्तु असल्याचे परिस्थीत सदर ठिकाणी आले असता आम्ही वरील स्टाफने
१३/१० वा.सदर इसमांना जागीच पकडुन त्यांना नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे १) जितेंद्र शिवराम मोहीत वय ३२


वर्षे रा.श्रीवर्धन रायगड २)योगेश यशवंत पाते वय ३० वर्षे रा.दिवे आगर रायगड ३) कुमार यशवंत सावंत वय ४६ वर्षे रा. चिचंवड गांव ता.शिरोळ जि.कोल्हापुर असे सांगितले त्यांचे जवळील बॅगेची पाहणी करता त्यामध्ये एक जिंवत खवले जातीचे मांजर मिळुन आले त्याबाबत सदर इसमांना विचारणा करता त्यांनी ते विक्री करता आणले असल्याचे सांगितले.त्यांनी बेकायदेशीररित्या दर्मिळ खवले मांजर हे विक्रीकरीता कब्जात बाळगले असल्याचे मिळून आल्याने ते खवले मांजर ताब्यात घेवुन ते प्राणी संग्रहालय कात्रज पुणे येथे जमा करणेत आले आहे. बाबत वरील तीन इसमाविरुध्द चंदननगर पो.स्टे.गु.र.नं.३८४/१९ वन्य जिव संरक्षण कायदा सन १९७२ चे कलम २(१६),३९(ब).९,४४,५० व ५१ प्रमाणे गुन्हा दाखल असुन सपोनि. गजानन जाधव, तपास पथक हे करीत आहेत.


सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्तसो, पुर्व प्रादेशिक विभाग – श्री. सुनिल फुलारी सो, मा. पो.उप आयुक्त, परि. ४ – श्री. प्रसाद अक्कानवरु सो, मा. सहा.पो.आयुक्त सो, येरवडा विभाग – श्री. रामचंद्र देसाई सो, व.पो.निरी. – शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. गजानन जाधव, पोना. तुषार आल्हाट, पोहवा. अजित धुमाळ, पो.हवा. राजेद्रं दिक्षीत, पो.हवा. श्रीकांत गांगुर्डे, पोना. दत्ता शिंदे, पो.ना. अमित जाधव, पोना. शकुर पठाण, पोशि. परशुराम शिरसाट, पोशि. सुभाष आव्हाड यांनी केलेली आहे.