Home शहरे सांगली केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी घेतली भिडे गुरुजींची भेट, ‘हे’ आहे भेटीचं कारण!

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी घेतली भिडे गुरुजींची भेट, ‘हे’ आहे भेटीचं कारण!

0

सांगली : आपल्या वक्तव्यांमुळे कायम वाद आणि चर्चेत राहणारे शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरूजी यांची सांगलीत सोमवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भेट घेतली. प्रचारात अतिशय व्यस्त असतानाही त्यांनी वेळ काढून भिडे गुरूजींची भेट घेतल्याने राजकीय चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी इराणी या सांगलीत आल्या होत्या. भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली. सभेनंतर त्यांनी गुरूजींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्या आणि इतर नेते गुरूजी राहत असलेल्या घरी गेले आणि त्यांची भेट घेऊन चर्चा केली.

स्मृती इराणी आपल्या भावावर का ‘जळतात’, त्यांनीच केला हा खुलासा!

भिडे गुरूजींनी त्यांच्याशी काही वेळ देशातल्या सध्याच्या स्थितीविषयी चर्चा केली आणि शुभेच्छा दिल्या. त्यांनी इराणींना गणपतीचा फोटोही भेट दिला. भिडे गुरूजींबद्दल जसे वाद आहेत तसे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा 2014मध्ये रायगडावर आले होते त्यावेळी भिडे गुरूजीही तिथे होते. भिडे गुरूजी यांनी आदेश दिले, त्याला मी नाही म्हणू शकलो नाही, मला यावच लागलं असंही त्यावेळी मोदींनी बोलताना सांगितलं होतं. भिडे गुरूजींनी स्मृती इराणींना रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी येण्याचं निमंत्रणही दिलं.

अमित शहांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत खुलासा, हा नेता सांभाळणार धुरा

भाजपसहीत अनेक पक्षांचे नेते भिडी गुरूंची चाहते आहेत. खुद्द मोदीही त्यांना मानत असल्याने भिडे गुरूंजींना भेटण्यासाठी स्मृती इराणी या उत्सुक होत्या. गुरूजींचा साधेपणा, विचार आणि तरुणांमध्ये असलेलं संघटन याची माहिती स्मृती इराणींना होती.

‘चंपा’वरून युद्ध पेटलं, भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार

प्रचारासाठी सांगलीतच येणं होणार असल्याने त्यांनी ती संधी साधत भिडे गुरूंजी भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. योगा योगाने गुरूजीही सांगलीतच असल्याने त्यांनीही भेटायला हरकत नसल्याचा निरोप दिला आणि ही भेट झाल्याची माहिती गुरूजींच्या कार्यकर्त्यांनी दिलीय.