Home शहरे सांगली जिल्हा परिषदेच्या आवारात दिव्यांग मतदार जनजागृती – मुख्य कार्यकारी अभिजीत राऊत

जिल्हा परिषदेच्या आवारात दिव्यांग मतदार जनजागृती – मुख्य कार्यकारी अभिजीत राऊत

0

दिव्यांग मतदार जनजागृतीसाठी वस्तू खरेदी करून सहभाग नोंदविण्याचे आवाहन

सांगली : विधानसभा निवडणूक दिव्यांग मतदार जनजागृती व सांगली जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तुंचे विक्री व प्रदर्शन दिनांक १७ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन जिल्हा परिषद सांगलीच्या आवारामध्ये आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनास नागरिकांनी भेट देऊन दिव्यांग सक्षमीकरणासाठी आपला हातभार लावावा. दिव्यांगाच्या पुनर्वसनासाठी व दिव्यांग मतदार जनजागृतीसाठी वस्तू खरेदी करून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन नोडल अधिकारी (दिव्यांग मतदार) तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

प्रदर्शनामध्ये एकूण २५ दिव्यांग शाळा व कर्मशाळा यांचे स्टॉल भरविण्यात येणार असून या स्टॉलमधून दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. तसेच सदर स्टॉलमध्ये दिपावलीच्या उपयुक्त साहित्य इतर उत्पादित साहित्य ठेवण्यात येणार आहे. दिव्यांग मतदार जनजागृतीसाठी दोन स्टॉल राखीव ठेवण्यात येणार असून त्यामध्ये ईव्हीएम मशिन व व्हीव्हीपॅट मशिन यांचे दिव्यांगासाठी प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी दिली.