Home बातम्या महत्वाच्या बातम्या मतदारांच्या तक्रार निवारणासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना – जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे

मतदारांच्या तक्रार निवारणासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना – जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे

0

पालघर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे निवारण करण्याकरता नियंत्रणकक्ष स्थापन करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी सांगितले आहे यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून या नियंत्रण कक्षात कर्मचारी व अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अ.क्र.अधिकाऱ्याचे नाव/ पदनामपद / कायक्षेत्र
1श्री. विजय चौधरी, सहायक कामगार आयुक्त.नियंत्राण कक्ष प्रमुख- पालघर जिल्हा
2श्री. संकेत कानडे, सहायक कामगार आयुक्त.तपासणीस- बोईसर, डहाणु, पालघर
3श्री. राजेंद्र चव्हाण, सरकारी कामगार अधिकारीतपासणीस- विक्रमगड
4श्री. गजानन जोंधळे, सुविधाकारतपासणीस- वसई, नालासापोरा
5श्री. सिद्धेश संखे, लिपिक टंकलेखककार्यालयीन कामकाज

मतदानाच्या दिवशी नियुक्त करण्यात आलेल्या वरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी मतदान प्रक्रिया समाप्तीपर्यंत उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी केले आहे. नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी मतदानाच्या दिवशी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्राप्त होणाऱ्या तक्रारी अथवा स्थापना,  कारखाने यांना विशेष भेटी देऊन तेथील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी किंवा दोन तासाची सवलत देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी तसेच ज्या आस्थापनेत,कारखान्यात  ही सवलत दिली जाणार नाही संबंधितांविरुद्ध भा. द.वि.स. च्या कलम 188 अंतर्गत कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल .तसेच सदर नियंत्रण कक्षात प्राप्त तक्रारी  अनुषंगाने करण्यात आलेला कार्यवाही बाबतचा सविस्तर अहवाल मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर तातडीने सादर करावा अशा सूचना देखील जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी केल्या आहेत.