Home पोलीस घडामोडी माथेरान मध्ये सेल्फी काढण्याच्या नादात 400 फूट खोल दरीत पडलेल्या व्यक्तीस सुखरूप बाहेर काढण्यात पोलीस व रेस्क्यू टीमला यश

माथेरान मध्ये सेल्फी काढण्याच्या नादात 400 फूट खोल दरीत पडलेल्या व्यक्तीस सुखरूप बाहेर काढण्यात पोलीस व रेस्क्यू टीमला यश

0


माथेरान : अजित प्रभाकर बर्वे वय वर्षे 62 असे या गृहस्थाचे नाव असून तो विले पार्ले मुंबई येथील राहणारा आहे. दोन दिवस माथेरान फिरण्याकरिता आलेले अजित बर्वे 10 तारखेला अजित हे सकाळी साडे नऊ वाजता एको पॉईंट फिरण्यासाठी गेले असता सुरक्षा कठडे ओलांडून दरी न्याहाळत मोबाईल ने सेल्फी काढत होते, हिरवे गवत ओले असल्याने अचानक त्यांचा पाय घसरून ते 400 फूट खोल दरीत कोसळले. पण दैव बलवत्तर म्हणून तो डोंगरा च्या अर्ध्यात अडकून राहिले व मदतीकरिता वाचवा वाचवा म्हणून ओरडू लागले असता या पॉईंट वर फिरत असलेल्या लोकांनी आवाज ऐकून पोलिसांना सांगितले असता, लागलीच पोलीस हवालदार सुनील पाटील, नारायण बार्शी, पोलीस नाईक महेंद्र राठोड, पोलीस शिपाई प्रशांत गायकवाड, राहुल पाटील, राहुल मुंढे यांनी घटनास्थळ गाठले व रेस्क्यू टीमचे सुनील कोळी सुनील ढोले, अमित कोळी, अक्षय परब, उमेश मोरे, संतोष केळगणे, अमोल सकपाळ, दिनेश सुतार यांना पाचारण केले दरीत दोरीच्या साहाय्याने उतरून तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर अजित याना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.