Home गुन्हा अवैध्य दारू धंदे नष्ट करण्यात खालापूर पोलिसांना आले यश

अवैध्य दारू धंदे नष्ट करण्यात खालापूर पोलिसांना आले यश

0

खालापूर : खालापूर तालुक्यातील असणारे वेगवेगळे उद्योग धंदे व त्यावर काम करणारे मजूरवर्ग व इतर कामगार यांचा विचार करता खालापूर तालुक्यामध्ये डोंगरभाग व इतरत्र मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी दारू गाळण्याच्या हातभट्ट्या होत्या. परंतु मागील वर्षभरापासून दारू गाळणा-या हातभट्ट्यावंर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण आणण्यात पोलीस विभागाला यश प्राप्त झालेले होते. परंतु घोडीवली परिसरातून मागील 15 दिवसापासून गावठी दारू गाळली जात असल्या बद्दलची पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस निरीक्षक श्री.विश्वजित काइंगडे यांच्या मार्गदर्शना खाली पोह/2154 योगेश जाधव, पोना/1168 हेमंत कोकाटे,पोना/1091 रणजित खराडे, पोशी/1004 दत्ता किसवे, यांचे पथक नेमून सदर बाबत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सदर पथकाने तेथे जंगलभागातील नेमक्या ठिकाणची माहिती करून घेतली. व तेथे अचानक छापा टाकून तेथे मिळून आलेली भट्टी पूर्णपणे उधवस्त करून तेथे मिळून आलेली दारू गाळण्याचे साहित्य ,कॉईल,चाटूक, 4 ड्रम, 200 लिटर तयार गावठी दारू व 200 लिटर रसायन असे एकूण 2,00,000/-किमतीचा मुद्देमाल नष्ट केलेला आहे. यासारखी कारवाई यापुढेही सुरु राहील याबाबत पोलीस निरीक्षक श्री.विश्वजित काइंगडे, यांनी मनोदय व्यक्त केलेले आहे. कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे खालापूर पोलीस ठाणे हद्दीत सुरु असल्यास त्याबद्दलची माहिती पोलीस ठाण्यास द्यावी त्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल. त्यामुळे जनतेने याबाबत पुढाकार घेऊन माहिती द्यावी असे अवाहन करण्यात आले.