Home गुन्हा युनिट-१ गुन्हे शाखांनी,गुन्हेगारांना पकडुन त्यांचेकडून कोयता, सुरा, चॉपर अशी घातक शस्त्रे हस्तगत केली

युनिट-१ गुन्हे शाखांनी,गुन्हेगारांना पकडुन त्यांचेकडून कोयता, सुरा, चॉपर अशी घातक शस्त्रे हस्तगत केली

0

पुणे : परवेज शेख घातक शस्त्राने गुन्हे करणारे व मोक्का केस मध्ये पाहिजे असलेले सराईत गुन्हेगारांना पकडुन त्यांचेकडून कोयता, सुरा, चॉपर अशी घातक शस्त्रे हस्तगत करण्यात युनिट-१ गुन्हे शाखा,पुणे शहर पोलीसांना यश

मिळालेल्या माहितीनुसार अधिकारी व कर्मचारी दिनांक १२/१०/२०१९ रोजी युनिट-१ हद्यीत पेट्रोलींग करीत असताना युनिट-१ कडील पोलीस कर्मचारी श्रीकांत वाघवले व इरफान मोमिन यांना त्यांचे बातमीदाराकडुन मिळालेल्या बातमीवरून मंगळवार पेठ कडबाकुटटी जवळ बालाजी जनरल स्टोअर्स जवळ कटटयावर बसलेले सराईत गुन्हेगार नामे १) ओकार दिलीप फडतरे वय २३ वर्ष रा त्रिमुर्ती कॉलनी,किसन देवकर चाळ दिपक मेडिकल जवळ पिंपळे गुरव २) जलालुधिन निजामुद्यिन शेख वय १९ वर्ष रा वाकड रोड सदगुरु कॉलनी आर्या मेडिकल जवळ वाकड पुणे असे बसलेले असलेबाबत बातमी मिळाली. त्या अनुषंगाने सापळा लावून वरील स्टाफसह सदर ठिकाणी जावून छापा टाकला. छाप्यात ते दोघे मिळून आले. त्यांचा एक साथीदार रुपेश गायकवाड हा पळून गेला. त्या दोघान ताब्यात घेवून त्यांचे कडील सॅकची पाहणी करता त्यामध्ये एक कोयता, चॉपर व एक चाकु अशी घातक शस्त्रे मिळून आली. ती जप्त करण्यात आली आहेत. सदर इसम व त्यांचा पळून गेलेला साथीदार यांचे विरुध्द फरासखाना पो स्टे येथे गुरनं ३७६/२०१९ आर्म अॅक्ट कलम ४-२५ महा.पो का क ३७-१ सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई ही श्री.अशोक मोराळे साो., अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. बच्चन सिंग, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. श्री. शिवाजी पावार, सहा. पोलीस आयुक्त, प्रतिबंधक यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरुण वायकर, पो उप निरीक्षक उत्तम बुदगुडे, पो उप निरी हनुमंत शिंदे, पो उप निरी लहु सातपुते, पो ना श्रीकांत वाघवले, पो ना इरफान मोमिन, पो ना सुधीर माने, सपोफौ बाबा चव्हाण, पो.हवा. योगेश जगताप, सुभाष पिंगळे, तुषार माळवदकर यांनी केली आहे.