Home गुन्हा दृश्यम स्टाईलने खुन करणारे आरोपी जेरबंद

दृश्यम स्टाईलने खुन करणारे आरोपी जेरबंद

0


पुुणे : परवेज शेख दि.14/10/2019 रोजी शिक्रापुर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. 21/2017 भा.द.वि.क.420, मिळालेल्या माहितीनुसार, 3 ऑक्टोबर रोजी गॅरेज व्यावसायिक
हनुमंत ऐवळे (वय २७, रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जिल्हा पुणे) हे
रात्री साडेआठ वाजता राहत्या घराच्या बाहेरून गायब झाले होते.
दि. 10 ऑक्टोबर रोजी बुर्केगाव, ता. शिरूर, जि. पुणे येथील
नदीपात्रात हातपाय बांधलेल्या व कुजलेल्या अवस्थेत एका
पुरुषाचे प्रेत आढळून आले. सदर मयताची ओळख पटवून
अनोळखी आरोपीला शोधण्याबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस
अधीक्षक संदीप पाटील आणि पोलीस निरीक्षक पद्माकर धनवट
यांनी पथकाला सूचना दिल्या. त्याप्रमाणे सदर मयताचे नाव
हनुमंत ऐवळे असल्याचे निष्पन्न झाल्यावर खुनी शोधण्याचे काम
अत्यंत अवघड होते.

कारण खून विचारपूर्वक केला होता. सदर
खून आर्थिक कारणावरून आरोपी सोमनाथ भुजबळ व त्याचा
साथीदार सुमित नरके दोघंही रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि.
पुणे यांनी केला असून, त्यांच्याबरोबर आणखी एक साथीदार
असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी हनुमंत ऐवळे यांच्याकडून
उसने पैसे घेतले होते. त्याबाबत सोमनाथ व त्यांच्यात वाद झाला
होता. त्यामुळे त्यांनी कट रचून सदर खून केल्याचे निष्पन्न झाले
आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील,
बारामती पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना,
अपर पोलीस अधीक्षक पुणे विभागचे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक पद्माकर धनवट, सहायक पोलीस निरीक्षक
दत्तात्रय गुंड, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर,
दयानंद निम्हण, हवालदार उमाकांत कुंजीर, पोलीस नाईक एम.
आय. मोमिन, विजय जाधव, जनार्दन शेळके, हवालदार सचिन
गायकवाड, धिरज जाधव, अक्षय जावळे यांनी केली आहे.