Home गुन्हा सामान्य नागरिकांची फसवणूक करणारा आरोपी जेरबंद

सामान्य नागरिकांची फसवणूक करणारा आरोपी जेरबंद

0

पुणे : परवेज शेख सामान्य नागरिकांना लोन करुन इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदी करून देण्याच्या बहाण्याने फसवणुक करणारा, २ वर्षापासुन पाहिजे असलेल्या आरोपीस युनिट – १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडून जेरबंद दि.२३/०३/२०१७ रोजी रिलायन्स डिजीटल,फातीमानगर पुणे येथे मोबाईल खरेदी करण्यासाठी गेले असता तुम्हाला लोन करुन मोबाईल खरेदी करुन देतो असे सांगुन कागदपत्रे घेवुन त्यांचे नावावर लोन पास करुन मोबाईल घेतला व तो मोबाईल परस्पर घेवन जावून फसवणुक केले

दि.१३/१०/२०१९ रोजी युनिट -१. गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी व कर्मचारी समर्थ पोलीस ठाणेचे हद्दीत पेट्रोलिंग करिता असताना पोलीस कर्मचारी अमोल पवार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हयांत २ वर्षापासुन फरारी असलेला आरोपी सनी अवघडे हा कासेवाडी येथे रोडवर उभा आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्या बाबत वरिष्ठांना माहिती देवुन त्यांचे परवानगीने युनिट-१. गुन्हे शाखा, पुणे शहर पथकाकडील स्टाफसह बातमी प्रमाणे जावुन नमुद आरोपीस ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सनी शांताराम अवघडे,वय ३७ वर्ष रा कासेवाडी भवानी पेठ, पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याचेकर्ड वानवडी पोलीस स्टेशनकडील वरील दाखल गुन्हयाचे अनुशंगाने त्यांस विश्वासात घेवुन तपास करता त्याने सांगितले की, मी व माझा साथिदार असे आम्ही लोन करुन मोबाईल खरेदी करुन देतो असे सांगुन कागदपत्रे घेवुन त्यांचे नावावर लोन पास करून मोबाईल घेतला व तो मोबाईल परस्पर घेवुन गेलो होतो व सदर गुन्हा दाखल झाले पासुन सुमारे २ वर्षापासन मी फरार आहे तसेच अशा प्रकारे खडकी,पुणे येथे गुन्हा केल्याचे सांगितलेने खडकी पोलीस स्टेशन येथे खात्री केली असता खडकी पोलीस स्टेशन गु.र.नं.१४६/२०१७ भा.द.वि. ४२०,४०६ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीस पुढील कारवाई कामी वानवडी पोलीस स्टेशन,पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदर आरोपीने सामान्य नागरिकांना लोन करुन इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदी करून देण्याच्या बहाण्याने फसवणुक केलेबाबत पुणे शहरात यापुर्वी समर्थ पोलीस स्टेशन येथे २ , बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे येरवडा पोलीस स्टेशन येथे १ असे एकुण ४ गुन्हे दाखल आहेत

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हें श्री अशोक मोराळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री बच्चन सिंह, यांचे मार्गदशनाखाली युनिट-१. गुन्हे शाखा. पुणे शहरचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण वायकर, पोलीस कर्मचारी अमोल पवार, वैभव स्वामी, अजय थोरात, अनिल धाडगे योगेश जगताप,बाबा चव्हाण,सुभाष पिंगळे यांनी केली आहे,