बोरघर / माणगाव : ( विश्वास गायकवाड ) माणगाव शहरातील दत्त नगर मधील जंगलातील झाडीत एका विवस्त्र , कुजलेली तसेच डोक नसलेली एका अनोळखी महिलेची मृृतदेह सापडला असुन अंदाजे चार ते पाच दिवसापूर्वी या महिलेस मारुन तिचे शरीरा पासून सूरी च्या सहाय्याने तिचे डोके वेगळे केलेले अढळल्याची घटना आज दि. 16/10/19 रोजी घडली.
सविस्तर असे कि माणगाव मध्ये दत्त नगर मधील वनवासी अधिवासी आश्रम शाळेजवळच जंगल आहे. या जंगलातील झाडीत एका अनोळखी महिलेचा फार कुरपणे हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तीस टाकले असल्याचे आढळेल. आश्रम शाळेतील स्वयंपाकि श्री वाघमारे यांच्या हा मृतदेह निदर्शनास आल्याने त्यांनी पोलिसाना कळविले.
सदर स्थळी पोलिसांनी येऊन पोलिस तपास अंतर्गत माहिती घेऊन डॉग स्कोड व फॉरेन्सिक लॉब अधिकारी यास पाचारण केले. तरि या गुन्हाचा अधिक तपास जिल्हा अधीक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि रामदास इंगावले हें करीत आहेत. ऐन निवडणुकीच्या वेळेत ही खळबळजनक घटनेने वेगवेगळी चर्चेला उधाण आला आहे. तसेच मागील महिन्या भरा पासून महिलांनवरील अत्याचारच्या घटना खुप घडत असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे.