Home बातम्या वाडेश्वर कट्ट्यावर पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन

वाडेश्वर कट्ट्यावर पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन

0

वाडेश्वर कट्ट्यावर पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन
प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे,अभिनेते प्रवीण तरडे आणि वाडेश्वरच्या ज्येष्ठ कामगार तुकाराम कुमकर यांना प्रकाशनाचा मान

पुणे: परवेज शेख

पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन १६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता फर्गसन रस्त्यावरील हॉटेल वाडेश्वर कट्ट्यावर झाले . प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे,अभिनेते प्रवीण तरडे आणि खवैय्या पुणेकरांची मनोभावे खान पान सेवा करणारे वाडेश्वरचे ज्येष्ठ कामगार तुकाराम कुमकर यांना प्रकाशनाचा मान देण्यात आला . या सर्वांच्या हस्ते प्रकाशन झाले .

अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत पुण्यातील यशस्वी साहित्य संमेलनानंतर पुणे शहरावर दरवर्षी दिवाळी अंक ‘पुण्यभूषण ‘ या नावाने काढण्याची अभिनव प्रथा डॉ सतीश देसाई यांनी साहित्य संस्कृती विश्वात सुरु केली.एका शहराला समर्पित असलेला हा एकमेव दिवाळी अंक मानला जातो.या परंपरेतील हा नववा दिवाळी अंक आहे .

पुण्यभूषण फौंडेशन आणि त्रिदल संस्थेचे अध्यक्ष डॉ सतीश देसाई म्हणाले,’’दरवर्षी आम्ही पुण्याला साजेशी संकल्पना घेवून प्रकाशन समारंभ आयोजित करीत असतो.यावर्षी पुण्याच्या कट्टा संस्कृतीतील मानाचे पान असलेल्या ‘वाडेश्वर हॉटेल ‘ या कट्ट्यावर प्रकाशन समारंभ केला .याच कट्ट्यावर एरवी वर्षभर मान्यवर पुणेकरांना निमंत्रित करून त्यांच्याशी गप्पा मारण्याचा साप्ताहिक उपक्रम दर गुरुवारी सकाळी केला जातो.’’

यापूर्वी पोस्टमन,सांस्कृतिक विश्व ची बातमीदारी हाताळणारे पत्रकार ,दगडूशेठ गणेश मंदिर ,बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारखे विविध मान्यवर पुणेकरांना आणि ठिकाणांना प्रकाशन समारंभाचा मान दिला गेलेला आहे.यावर्षीच्या अंकातील पहिले मानाचे पान भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ शिवाजीराव कदम यांना समर्पित करण्यात आले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे ,पुणेकरांचे आणि अनिवासी पुणेकरांचे लेख ,आठवणी हे यावर्षीच्या पुण्यभूषण दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य आहे .

राहुल देशपांडे म्हणाले,’पुण्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पुणेरी प्रतीके आहेत. पुण्यभूषण दिवाळी अंक हे एक पुण्याचे वैशिष्ट्य बनले आहे. पुण्यात कानसेन, रसिक मंडळी मोठ्या प्रमाणावर आहेत. आज कोणीही पंडित पदवी लावतो, त्याचा सूर लागला नाही तर त्याचेही कान पुणेकर पकडतात. पुण्याची ही परंपरा आणि रसिक प्रवृत्ती पुणेकरांनी जपून ठेवावी.

प्रवीण तरडे म्हणाले, ‘ राहुल देशपांडे आणि मला बोलवून पुण्याच्या सुरेल आणि रगेल सूर एकत्र आणले आहेत. पुरुषोत्तम स्पर्धा जिंकल्यानंतर पहिला सत्कार पुण्यभूषण तर्फे डॉ सतीश देसाई यांनी केला होता. आणि आज पुण्यभूषण दिवाळी अंक प्रकाशनाचा बहुमान दिला आहे

मकरंद टिल्लू, गोपाळ चिंतल यांनी स्वागत केले. दिलीप कुंभोजकर यांनी आभार मानले.

प्रल्हाद भागवत,श्रीकांत शिरोळे,सुरेश(काका) धर्मावत, रवी चौधरी, भाऊसाहेब कासट,गिरीश मुरुडकर, अभय वडझिरकर उपस्थित होते