Home बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत असून वाहतुकीत बदल करण्यात येत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत असून वाहतुकीत बदल करण्यात येत आहे

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत असून वाहतुकीत बदल करण्यात येत आहे

पुणे : परवेज शेख मा. पंतप्रधान,भारत सरकार हे दिनांक- १७/१०/२०१९ रोजी पुणे दौ-यावर येत असून त्यांची एस.पी.कॉलेज पुणे येथे प्रचार सभा असल्याने सदर भागात मोठ्या प्रमाणात नागरीक येणार असल्याने त्या भागातील


वाहतुक सुरक्षीत व सुरळीतपणे चालने इष्ट आहे, त्याअर्थी महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र.एम.व्ही.ए.०१९६/८७१/सीआर-३७/टिआरए-२,दिनांक-२७/०२/१९९६ चे नोटीफीकेशन नुसार मोटार वाहन कायदा कलम ११५.११६(१) (ए) (बी).११६(४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन मी, पंकज
देशमुख, पोलीस उप आयुक्त,वाहतुक शाखा पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा.फायरब्रिगेड,पोलीस वाहने,रुग्णवाहिका इ.) खेरीज करुन दिनांक- १७/१०/२०१९ रोजी, दुपारी १२.०० ते रात्री २४.०० वा.पर्यंत एस.पी.कॉलेज व परिसरातील वाहतुक आवश्यकत्ते नुसार बंद/वळविण्यात येणार असून त्याबाबत आदेश निर्गमित
करीत आहे.

वाहनचालकांनी जंगली महाराज रोडवरील खंडोजीबाबा चौकातुन संभाजी पुलाकडे न जाता उजवीकडेवळून कर्वेरोडने इच्छितस्थळी जाणे.

दांडेकर पुलाकडून अलका टॉकीजकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदर वाहनांनी

सावरकर चौक,मित्रमंडळ चौक मार्गे इच्छितस्थळी जाणे.

स्वारगेट, सारसबाग कडून टिळकरोडला जाणारी वाहतुक पुरम चौकातून बंद करण्यात येणार असून

सदर वाहनाचालकांनी बाजीरावरोडने इच्छितस्थळी जाणे.शाहुपुल-दत्तवाडी-जनतावसाहत-पर्वतीपायथ्याकडून येणा-या वाहनांनी डावीकडे वळून नाथ पै चौक,एस.पी.कॉलेजकडे जाणार नाहीत सदर वाहनचालकांनी उजवीकडे वळून कल्पना हॉटेल,सणस पुतळ्याकडून इच्छितस्थळी जाणे.

तसेच सणस पुतळा,कल्पना हॉटेलकडून येणारी वाहने ना.सी.फडके चौकातून सरळ नाथ पै चौकाकडे

जाणार नाहीत. तसेच डावीकडे वळून एस.पी.कॉलेज चौकाकडे जाणार नाहीत त्यांनी केवळ शाहूपुलाकडे अथवा सिंहगड रोडने इच्छितस्थळी जातील.

दिनांक- १७/१०/२०१९ रोजी दुपारी १२.०० ते रात्री २४.०० वा. पर्यंत शास्त्रीरोड,टिळकरोड वरील सर्व प्रकारची पार्कीग रद्द करण्यात येत असून सदर ठिकाणी नमूद कालावधी करीता नो-पार्कीग करण्यात येत आहे.

सभेच्या परिसरात वाहन पार्कीग करण्याकरीता वाहन पार्कीग ठिकाणे अत्यल्प असल्याने सभेसाठीयेणा-या नागरीकांनी आपली खाजगी वाहने न आणता सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सोबत कोणतेही सामान बाळगु नये.

तरी वाहनचालक नागरीकांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी सभेच्या मार्गावर न येता पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.