२२ वर्षापासून पाहिजे असलेले दोघे आरोपी शिक्रापूर पोलिसांनी केली अटक

- Advertisement -

पुणे : परवेज शेख दरोडयाच्या गुन्हयात २२ वर्षापासून पाहिजे असलेले दोघे आरोपी शिक्रापूर येथून ताब्यात आगामी निवडणूक २०१९ चे अनुषंगाने मा.पोलीस निरीक्षक, स्था. गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे आदेशाने रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम राबवित असताना, दिनांक १६/१०/१९ रोजी LCB टिमला

मिळालेल्या बातमीवरून यवत पो.स्टे. गु.र.नं. १०३/९७ भादंवि क.३९५ या दरोडयाच्या गुन्हयातील रेकॉर्डवरील (पाहिजे आरोपी यादी क्र. ९४९ व ९५०) मधील आरोपी नामे –
१)राजकमल उर्फ वाल्मीक जागसिंग उर्फ जागडी कंजारभाट उर्फ बिरावत वय ५५ वर्षे रा.खुटबाव ता.दौंड जि.पुणे. सध्या रा.शिक्रापूर, बजरंगवाडी ता.शिरुर जि.पुणे.
२)मोरसिंग गांडा उर्फ साबसिंग कंजारभाट उर्फ बिरावत वय ५७ वर्षे रा.खुटबाव ता.दौंड जि.पुणे. सध्या रा.पिंपळे जगताप , पॉवर हाऊसजवळ ता.शिरुर जि.पुणे
या दोघांना शिक्रापूर येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर आरोपींची वैदयकिय तपासणी करुन यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

- Advertisement -