Home गुन्हा 12 तासाच्या आत अनोळखी प्रेताची ओळख पटऊन आरोपीस अटक करण्यात माणगाव पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची उत्कृष्ठ कामगिरी

12 तासाच्या आत अनोळखी प्रेताची ओळख पटऊन आरोपीस अटक करण्यात माणगाव पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची उत्कृष्ठ कामगिरी

0

माणगाव : पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 16/10/2019 रोजी 07.00 वा. सुमारास विजया गोपाळ गांधी आश्रमशाळा दत्तनगर येथील स्टाफ संतोष मधुकर वाघमारे व अरूण गणु पाटील यांनी माणगांव पोलीस ठाण्यात येवुन कळविले की, सकाळी 06.30 वा. सुमारास त्यांचा मोठा मुलगा रोहित वाघमारे व त्याचा मित्र संतोष घुमकर असे अमित कॉम्पलेक्सचे पाठिमागे कॉरीचे मागिल बाजुस फिरण्यास गेले असता त्यांना एका महिलेचा मृतदेह दिसला. त्याबाबत त्यांनी लगेच पोलीस ठाण्यात कळविले असता, अधिक माहिती घेणे करीता माणगांव पोलीस ठाणे येथील पोलीस स्टाफ यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता अमित कॉम्प्लेक्सचे पाठीमागील बाजुस जंगलभागात एक स्त्री जातीचे कपडे व शिर नसलेले प्रेत दिसुन आले. आजुबाजुला पाहणी केली असता सदर प्रेताचे शिर व कपडे बाजुच्या झुडपात टाकलेले मिळुन आले. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोशि/1361 शिंदे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून माणगांव पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.170/2019 भा.द.वि.सं. कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सदर अनोळखी मयत महिलेची ओळख पटविण्याकरीता माणगांव पोलीस ठाण्यातील मपोसई बुरूंगले, पोह/1195 कदम, पोशि/1361 शिंदे व  पोशि/1905 डोईफोडे यांनी दत्तनगर परिसरात एक महिला व पुरूष चार ते पाच दिवसांपासुन घरी आलेले नाहीत अशी गोपनिय माहिती मिळाल्यावरून तेथे जावुन चौकशी केली असता, महिला नामे शर्मीला राजेश चौधरी उर्फ सुतार वय- 40 वर्षे, आणि तीचा पती राजेश राजगिरी चौधरी हे चार ते पाच दिवसापासुन घरी आले नसल्याचे समजले तेव्हा त्यांची घरमालकीन यांना घटनास्थळावरून मिळुन आलेले कपडे व चप्पल यांचे फोटो दाखवले असता त्यांनी ते ओळखुन ते शर्मीला चौधरी हिचे असल्याचे सांगितले. तसेच घटनास्थळवर मिळुन आलेला सुरा हा राजेश चौधरी मासे कापण्याकरीता वापरत असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे सदरचे प्रेत हे शर्मीला हिचेच असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचा मुळ पत्ता घेवुन स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. पोरे व त्यांचे पथक यांनी त्यांचे मुळगावी रा. दत्तवाडी खेर्डी ता.चिपळून जि.रत्नागिरी येथुन आरोपी राजेश राजगिरी चौधरी यास ताब्यात घेवुन त्यास माणगांव पोलीस ठाण्यात आणले असता, त्याने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करून त्यास मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने त्यास दि. 22/10/2019 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केलेला आहे.  

तरी माणगांव पोलीस ठाणे व स्थनिक गुन्हे शाखा यांचे संयुक्त तपासामध्ये 12 तासाच्या आतमध्ये अनोळखी प्रेताची ओळख पटवुन आरोपीस अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे. सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकरीता माणगांव पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. सागर कावळे, मपोसई बुरूंगले, परि.पोसई श्री.काळे, पोह/1195 कदम, पोशि/1361 शिंदे, पोशि/1664 खिरीट, पोशि/1905 डोईफोडे, पोशि/2218 गित्ते, पोशि/362 म्हात्रे यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

 सदर गुन्ह्याचा तपास मा.श्री.अनिल पारस्कर, पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग, मा.श्री.सचिन गुंजाळ, अपर पोलीस अधीक्षक रायगड, मा.श्री.शशिकिरण काशिद उपविभागीय पोलीस अधिकारी माणगांव यांचे मार्गदर्शनाखाली श्री. रामदास इंगवले पोलीस निरीक्षक माणगांव हे करीत आहेत.