Home ताज्या बातम्या मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून मद्यविक्रीची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी; मुंबई उच्च न्यायलयाने

मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून मद्यविक्रीची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी; मुंबई उच्च न्यायलयाने

0

मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून मद्यविक्रीची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी; मुंबई उच्च न्यायलयाने 

भूषण गरुड : विधानसभा निवडणुकांचीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत. उद्या  राज्यातील 288 जागांसाठी मतदान होणार आहे. तर गुरुवारी 24 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडणार आहे. या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून मद्यविक्रीची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायलयाने  दिली आहे.

मुंबई उच्च न्यायलयाने दिलेल्या निर्णयानुसार, 24 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजल्यानंतर मद्यविक्रीची परवानगी देण्यात आली आहे. आज आणि उद्या या दोन्ही दिवशी दारुच्या विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी 4 ऑक्टोबर रोजी मतदानादिवशी मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी केला होता. या आदेशाला महाराष्ट्र वाईन मर्चंट्स असोसिएशनने कडाडून विरोध केला होता. तसेच याविरोधात वाईन मर्चंट असोसिएशनने न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान , जिल्हाधिकाऱ्यांनी मतदानादिवशी मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या घेतलेल्या  या निर्णयाला हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.