Home गुन्हा सिंहगड रस्त्यावरील वडगाव येथील उड्डाणपुलाच्या खाली एका तरुणावर धारदार शस्त्राने वार

सिंहगड रस्त्यावरील वडगाव येथील उड्डाणपुलाच्या खाली एका तरुणावर धारदार शस्त्राने वार

0

सिंहगड रस्त्यावरील वडगाव येथील उड्डाणपुलाच्या खाली एका तरुणावर धारदार शस्त्राने वार

पुणे शहरात सिंहगड रस्त्यावरील वडगाव येथील उड्डाणपुलाच्या खाली एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. याप्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये अनोळखी व्यक्तीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील वडगाव उड्डाणपपुलाखाली ओढा व कॅनॉलच्या मध्यभागी मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या पुलाच्या खाली 30 वर्षीय व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची खबर सिंहगड पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी धारदार शस्त्राने तरुणाच्या डोक्‍यावर व शरीरावर वार करुन गंभीर स्वरूपात जखमी झाल्याचे पोलिसांना निदर्शनास आला. पोलिसांनी वेळेचा विलंब न करतात तात्काळ जखमी तरुणास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.