Home ताज्या बातम्या महावितरणच्या विद्युत प्रवाह पोलवर चढून दुरुस्तीचे काम करणाऱ्या वायरमेनचा शॉक लागून मृत्यू

महावितरणच्या विद्युत प्रवाह पोलवर चढून दुरुस्तीचे काम करणाऱ्या वायरमेनचा शॉक लागून मृत्यू

0

महावितरणच्या विद्युत प्रवाह पोलवर चढून दुरुस्तीचे काम करणाऱ्या वायरमेनचा शॉक लागून मृत्यू

भूषण गरुड : पुणे शहरात विधानसभा 2019 निवडणुकीचे मतदान सुरु असताना. सोमवार दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 10:30 ते 11:00 वा. सुमारास साळवे गार्डन समोर व गोकुळ हॉटेलजवळ,कोंढवा बुद्रुक याठिकाणी महावितरणच्या विद्युत प्रवाह पोलवर चढून दुरुस्तीचे काम करणाऱ्या वायरमेनचा विद्युत प्रवाहाच्या वायरमध्ये अडकून शॉक लागून घटनास्थळी मृत्यू झाला.

शॉक लागून मृत्यू झालेला वायरमेन अमोल संबारे वय 24, धनकवडी उपविभाग,कात्रज महावितरण शाखा कार्यालयात वायरमेनचे काम करत असत.

सदर घटनेची माहिती अग्निशमन दल व पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होत. अग्निशमन दल व पोलिसांनी महावितरण पोलच्या विद्युत प्रवाहचा विद्युत पुरवठा खंडित करत पोलवर अडकलेल्या वायरमेनचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तसेच याघटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महावितरण कंपनीच्या जबाबदारहीन गलथान कारभारामुळे वायरमेनला जीव गमवावा लागला आहे. याघटनेमुळे वायरमेनला चालू विद्युत प्रवाह मध्ये काम करण्यास कोणी भाग पाडले!! वायरमनच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांनवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का ? असे प्रश्न परिसरातील नागरिक बोलत आहेत……