दि 22/10/2019. पहाटे. 5.45 वाजता
विर धरण
विर धरण परिसरात पावसाचा जोर असल्याने ,पाण्याची आवक वाढत असून पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे .त्यामुळे सांडव्यातून 54474 क्यूसेक्स ने प्रवाह पहाटे 6.00 वाजता सोडण्यात येणार आहे.पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी , नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये.
तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा.
विजय नलवडे
सहाय्यक अभियंता
वीर धरण उपविभाग