Home बातम्या दिवाळीचे औचित्य साधून आनंद विश्व गुरुकुलमध्ये बाल मेळा संपन्न

दिवाळीचे औचित्य साधून आनंद विश्व गुरुकुलमध्ये बाल मेळा संपन्न

0

ठाणे : विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहाराचे ज्ञान मिळावे या उद्देशाने शारदा एज्युकेशन सोसायटी संचिलत आनंद विश्व गुरुकुलमध्ये बुधवार, 23 ऑक्टोबर रोजी शाळेच्या आवारात बाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शाळेचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हेच विकेते आणि ग्राहक बनून व्यवहार करत असल्याने उत्साहाचे वातावरण होते.  दिवाळीनिमित्त प्रतिवर्षी आनंद विश्व गुरुकुलमध्ये बाल मेळावा भरतो. या वर्षीच्या बाल मेळाव्याचे उद्घाटन शारदा एज्युकेशन सोसायटीचे सेकेटरी डॉ. प्रा. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते, आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा हर्डीकर, आनंद विश्व गुरुकुलच्या मुख्याध्यापिका डॉ. वैदेही कोळंबकर आणि शिक्षक वर्ग, पालक उपस्थित होते.  यावर्षी बाल मेळ्यानिमित्त कार्टुनची थिम होती. प्रत्येक स्टॉलवर डोरेमॉन, मिकी माऊस, टॉम ऍन्ड जेरी, डोनॉल्ड दक यांच्या प्रतिमा उभारण्यात आल्या होत्या, ज्या विद्यार्थ्यांना आकर्षित करत होत्या. विकेत्याच्या भूमिकेत असलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खरेदी-विक्रीचे ज्ञान दिले. एकूण 22 स्टॉल उभारण्यात आले होते. खाद्यपदार्थांपासून हस्तकला, दिवाळी साहित्य, कपडे या स्टॉल्सचा त्यात समावेश होता. आईक्रिमचे गोळे, पाळणा यांचा आनंद विद्यार्थी पालकांबरोबरच शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांनी घेत बालपणीचा आनंद पुन्हा अनुभवला.