
रायगड-अलिबाग,दि.२७ (जिमाका):– रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग कार्यालयामार्फत जिल्ह्यात १२ ठिकाणी “रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र”चे आयोजन करण्यात येत असून याकरिता जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करुन रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी मुलाखतीकरिता उपस्थित रहावे.
सेवा संकल्प अभियान (१७ सप्टेंबर,२०२६ ते १७ ऑक्टोबर,२०२६) अंतर्गत दि. २९ सप्टेंबर, २०२६ रोजी कोकण व नाशिक विभागात एकाच दिवशी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत एकाच वेळी ४००+ ठिकाणी रोजगार मेळावे/प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित केले जाणार आहेत.
राज्यातील युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे, हा या उपक्रमांचा मूळ गाभा असून हा उपक्रम राज्यातील जिल्हा, तालुका व औद्योगिक परिसरांमध्ये राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने दि.२९ सप्टेंबर, २०२६ रोजी होणाऱ्या “रोजगार महाकुंभ महाराष्ट्र” अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग कार्यालयामार्फत रायगड जिल्ह्यामध्ये १२ ठिकाणी “रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात येत असून जिल्ह्यात १४९ कंपनी आस्थापनांनी नोंदणी केली आहे.
या रोजगार मेळाव्याकरीता उमेदवारांसाठी व उद्योजकांसाठी गुगल लिंक/क्युआर कोड विभागामार्फत तयार करण्यात आलेले आहे. त्यामार्फत उमेदवारांना व उद्योजकांना नोंदणी करता येईल.
नोंदणीकृत उमेदवारांकरीता दि.०७ सप्टेंबर ते २०२६ (पहिला टप्पा) दि. ११ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२६ (दुसरा टप्पा) या कालावधीत जिल्हयातील १६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Govt.ITI) मार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये उमेदवारांचा CV बनविणे, व्यक्तीमत्व विकास, प्रभावी स्वपरीचय, मुलाखत कौशल्य, प्रत्यक्ष निवड प्रक्रियेची तयारी, Mock Interview, संवाद कौशल्य इत्यादी विषय घेतले जाणार आहे.
जिल्ह्यातील युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे, हा या उपक्रमांचा मूळ गाभा असून हा उपक्रम राज्यातील जिल्हा, तालुका व औद्योगिक परिसरांमध्ये राबविण्यात येत आहे.
००००००

WhatsApp