
मुंबई, दि. १: स्वतःवर प्राणघातक हल्ला झाला असतानाही फ्लाय दुबई विमानाचे पायलट कॅप्टन स्मित माछर यांनी प्रसंगावधान राखून धीरोदात्तपणे विमानातील १८० प्रवाशांचे प्राण वाचवले. या असाधारण आणि प्राणांची बाजी लावणाऱ्या धैर्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकर कॅप्टन स्मित यांचा खरा हिरो असा उल्लेख करत, त्यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र सुपुत्र कॅप्टन स्मित तमाम भारतीयांसाठी सार्थ अभिमान ठरल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले आहेत.
‘मुंबईचा सुपुत्र आणि खरा ‘हिरो’ कॅप्टन स्मित यांच्याबद्दल मला अभिमान वाटतो. स्मित यांनी अत्यंत असाधारण आणि विलक्षण पद्धतीने शेकडो लोकांचे प्राण वाचवले! गंभीर दुखापतीतही स्मित यांनी दाखवलेली प्रसंगावधानता आणि धैर्य खरोखरच अनुकरणीय आहे. कठीण प्रसंगात प्रवाशांनीही एका टीमप्रमाणे तत्परतेने काम केलं, त्यांनाही सलाम. स्मित लवकर बरे व्हावे आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो, अशी कामना करतो! आपण युवकांसाठी प्रेरणास्थान आहात. महाराष्ट्र आणि देशाला आपला अभिमान वाटतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन संदेशात म्हटले आहे.
0000

WhatsApp