मुंबईत २९३ ग्राहकांना घरगुती वीज जोडणीस मंजुरी – महासंवाद

    - Advertisement -

    • १०२१ ग्राहकांच्या नावनोंदणीस मान्यता

    मुंबई, दि. १ : मुंबई शहरात सेवा संकल्प अभियानात विविध उपक्रम, सेवा देण्यात येत आहेत. शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, बेस्ट उपक्रमाच्या मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता, विभागीय अभियंता यांच्या निर्देशानुसार मुंबई शहर विभागात सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून वीज ग्राहकांच्या प्रलंबित सेवांना गती देत त्यांना तत्पर सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

    या अभियानांतर्गत मुंबई शहर विभागातील अर्ज केलेल्या 293 वीज ग्राहकांना घरगुती विद्युत जोडणी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीवरील नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविण्यासाठी अर्ज केलेल्या 1,021 वीज ग्राहकांच्या नावनोंदणीस मंजुरी देण्यात आली आहे. उपअभियंता संजय घेवडे, प्रशासकीय अधिकारी अमोल गावडे, मोहन काळे यांच्या हस्ते वीज जोडणी मंजुरी प्रदान करण्यात आली.

    ग्राहकांना विद्युत सेवांसाठी आवश्यक प्रक्रिया सुलभ व गतिमान पद्धतीने पूर्ण करून देण्यावर या अभियानात विशेष भर देण्यात येत आहे. नागरिकांच्या सेवा-सुविधांना प्राधान्य देत ‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येत असून, यामुळे वीज ग्राहकांना दिलासा मिळत आहे.

    000

    धोंडिराम अर्जुन/विसंअ

    - Advertisement -