मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन व स्वागत – महासंवाद

    - Advertisement -

    नाशिक, दि. ११ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी समवेत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा (विदर्भ, तापी व कृष्णा खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन होते.

    जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुख्यमंत्री व मंत्री महोदयांचे स्वागत केले. यावेळी आमदार गोकुळ गिते, प्रा. देवयानी फरांदे, दिलीप बनकर, ॲड राहुल ढिकले, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय ऐनपूरे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, सार्वजानिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, निफाड उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे आदी उपस्थित होते.

    000000

    - Advertisement -